‘आरटीओ’चे वीज कनेक्शन तोडले

By Admin | Published: March 18, 2015 12:00 AM2015-03-18T00:00:57+5:302015-03-18T00:05:51+5:30

महावितरणची कारवाई : अंधारात सुरू झाला कारभार; ६१ हजार थकबाकी

RTO broke the power connection | ‘आरटीओ’चे वीज कनेक्शन तोडले

‘आरटीओ’चे वीज कनेक्शन तोडले

googlenewsNext

कोल्हापूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) ६१ हजार ७८९ रुपयांची वीज थकबाकी राहिल्याने अखेर मंगळवारी महावितरणने वीजपुरवठा तोडला. दुपारी वीजपुरवठा बंद झाल्याने दिवसभर कार्यालय अंधारात राहिले. वीज बंदमुळे दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला. वीजपुरवठाच बंद असल्यामुळे आज, बुधवारीही कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाला बक्कळ महसूल मिळणारे कार्यालय म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय. या कार्यालयाचे १ जानेवारी ते २८ फेबु्रवारी २०१५ या कालावधीत असलेले ६१ हजार ७८९ रुपयांचे वीज बिल थकीत होते. महावितरणने त्यासाठी आरटीओला या महिन्यात नोटीस दिली; पण नोटीस देऊन १५ दिवस उलटले तरी या कार्यालयाने थकीत बिल भरले नाही. त्यामुळे मंगळवारी महावितरणचे पथक आरटीओ कार्यालयात गेले. त्यांनी या कार्यालयातील वीजपुरवठा तोडला. त्यामुळे संपूर्ण कार्यालय अंधारात बुडाले. तास-दोन तास झाले तरीही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. येथे कामासाठी आलेल्या नागरिकांना हा काय प्रकार आहे ते समजेना. दुपारनंतर कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी झाली. त्यानंतर कार्यालयातील युपीएस बॅकअपमधून काही काळ कामकाज सुरू राहिले.
दोनवेळा नोटीस...
जानेवारी महिन्याचे बिल थकीत होते. त्यामुळे आरटीओला फेब्रुवारीला नोटीस दिली. तेही बिल वेळेत भरले नाही. त्यामुळे मार्चमध्ये पुन्हा नोटीस दिली; तरीही बिल अदा केले नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महावितरणची थकबाकी अशी -
ग्राहक बिल थकीत (कोटींमध्ये)
१५ हजार १२६ (शहर)एक कोटी ११ लाख १८ हजार
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक
शेतीपंप - ३२८पाच कोटी
एक लाख २६ हजार ९१५ (जिल्हा)दहा कोटी ४९ लाख १९ हजार
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक
शेतीपंप - ५६ हजार ४८८२९ कोटी सात लाख २७ हजार

Web Title: RTO broke the power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.