इचलकरंजीत २४० कामगारांची आरटीपीसीआर चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:53+5:302021-07-15T04:17:53+5:30
इचलकरंजी : शहरातील यंत्रमाग कारखाने, सायझिंग, प्रोसेसर्स यासह वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य उद्योगातील कामगारांची नगरपालिकेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. ...
इचलकरंजी : शहरातील यंत्रमाग कारखाने, सायझिंग, प्रोसेसर्स यासह वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य उद्योगातील कामगारांची नगरपालिकेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. दोन दिवसामध्ये जवळपास २४० जणांची चाचणी करण्यात आली.
इचलकरंजी औद्योगिक शहर असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्या मोठी आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी दोन पथकामध्ये १२ लॅब टेक्निशियनची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील १ ते १३ व १४ ते २६ अशा दोन प्रभाग विभागणीद्वारे चाचणी होणार आहे. सोमवारी ६० व मंगळवारी १८० अशी एकूण २४० कामगारांची चाचणी केली. कामगारांची दर १५ दिवसांनी चाचणी करण्यात येणार असून, सुरुवातीस नगरपालिकेकडून केली जाणार आहे. त्यानंतर व्यावसायिकांनी स्वखर्चाने कामगारांची चाचणी करून घ्यायची आहे. व्यावसायिकांचे या कामास सहकार्य मिळत आहे.