शहरात ३२४ कामगार, उद्योजकांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:15+5:302021-04-21T04:24:15+5:30

कोल्हापूर : येथील महानगरपालिका आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने मंगळवारी कामगार, उद्योजकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शिबिर घेण्यात आले. त्यात ३२४ जणांची ...

RTPCR test of 324 workers and entrepreneurs in the city | शहरात ३२४ कामगार, उद्योजकांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी

शहरात ३२४ कामगार, उद्योजकांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी

Next

कोल्हापूर : येथील महानगरपालिका आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने मंगळवारी कामगार, उद्योजकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शिबिर घेण्यात आले. त्यात ३२४ जणांची चाचणी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये उद्योग सुरू ठेवायचे असल्यास ४५ वर्षावरील उद्योजक, कामगारांनी लस घेणे, ४५ वर्षाच्या आतील लोकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे तपासणी शिबिर घेण्यात आले. शिवाजी उद्यमनगरमधील इंजिनिअरिंग असोसिएशनमधील या शिबिराचे उद्‌घाटन शिल्पा दरेकर यांच्याहस्ते झाले. इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी स्वागत केले.

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, परवाना विभागाचे आर. एस. काटकर, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, डाॅ. संजना बागडे, रवींद्र पोवार, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी, जयदीप मांगोरे, चंद्रकांत चोरगे, किरण चरणे, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे उपस्थित होते. उपाध्यक्ष हर्षद दलाल यांनी शिबिराचे संयोजन केले.

दरम्यान, आज, बुधवारी वाय. पी. पोवारनगर औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेच्यावतीने मोफत आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे.

फोटो (२००४२०२१-कोल-आरटीपीसीआर चाचणी) : कोल्हापुरात मंगळवारी महापालिका आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने आरटीपीसीआर चाचणीचे शिबिर घेण्यात आले.

===Photopath===

200421\20kol_8_20042021_5.jpg

===Caption===

फोटो (२००४२०२१-कोल-आरटीपीसीआर चाचणी) : कोल्हापुरात मंगळवारी महापालिका आणि कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्यावतीने आरटीपीसीआर चाचणीचे शिबीर घेण्यात आले.

Web Title: RTPCR test of 324 workers and entrepreneurs in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.