महिलेशी असभ्य वर्तन; एकास एक वर्ष शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:56+5:302021-03-31T04:25:56+5:30
पीडित महिला ही लव्हाळा येथील विहिरीच्या नावाच्या शेतात आपल्या मुलगीसमवेत दि. ७ एप्रिल २०१६ रोजी जनावरांना चारा ...
पीडित महिला ही लव्हाळा येथील विहिरीच्या नावाच्या शेतात आपल्या मुलगीसमवेत दि. ७ एप्रिल २०१६ रोजी जनावरांना चारा काढत असताना संबंधित आरोपीने या महिलेशी असभ्य वर्तन केले होते. याप्रकरणी पीडित महिलेने शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. या खटल्याची सुनावणी शाहूवाडी मलकापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांच्यासमोर करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. रणधीर येळवे यांनी फिर्यादी त्याबरोबरच पंच, तपासी, अंमलदार व पीडित महिलेची मुलगी यांची साक्ष व त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे दाखले असा युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून कलम ३५४ नुसार एक वर्ष साधी कैद व एक हजार रुपये दंड, कलम ३५४ ए नुसार दोन हजार रुपये दंड व कलम ५०४ नुसार एक हजार रुपये दंड असा एकूण चार हजार रुपयांचा दंड केला असून, फिर्यादी पीडित महिलेस चार हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.