मुले पळवण्याच्या संशयावरुन कोल्हापुरातील रुकडीत महिलेस मारहाण, पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 06:35 PM2022-11-11T18:35:34+5:302022-11-11T18:35:56+5:30

याबाबतची अफवा पसरताच पालकांनी शाळेकडे धूम ठोकत पाल्यांना शाळेतून घरी नेले अन् गावात एकच गोंधळ उडाला.

Rukdi woman in Kolhapur was beaten and taken into custody by the police on suspicion of abducting children | मुले पळवण्याच्या संशयावरुन कोल्हापुरातील रुकडीत महिलेस मारहाण, पोलिसांनी घेतले ताब्यात

मुले पळवण्याच्या संशयावरुन कोल्हापुरातील रुकडीत महिलेस मारहाण, पोलिसांनी घेतले ताब्यात

Next

अभय व्हनवाडे

रुकडी-माणगाव : मागील काही दिवसापुर्वी मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या संशयितावरुन नागरिकांनी संशयितांना मारहाण केल्याच्याही घटना घडल्या होत्या. यातच आज पुन्हा हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे याच संशयावरुन एका महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, रुकडीत मुले पळवून नेणारी महिला आल्याच्या अफवेने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अशातच गावात एक फुगे विकणारी विद्रुप महिला आली होती. येथील शिवाजी चौकातील एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी गेली असता अंगावर चहा पडल्याने तेथेच कडेला कपडे बदलून परत गावात फुगे विकणेस जात असताना एका व्यक्तीने संशयावरून गावात मुले पळविणारी टोळी फिरत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली.

त्यातच गावातील एक मुलगी शेजारी खेळत असताना ती उशीरा घरी परतली नाही. तीचा शोध घेत असताना संशयित महिलेने मुलीला उचलल्याच्या चर्चाने गावकरी महिलेवर चाल करून गेले. याबाबतची माहिती गावात पसरताच पालकांनी शाळेकडे धूम ठोकत पाल्यांना शाळेतून घरी नेले अन् गावात एकच गोंधळ उडाला. गोंधळताच हरवलेली मुलगी घरी परतल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
दरम्यान पोलीस पाटील कविता कांबळे यांनी याबाबत हातकणगंले पोलीस स्टेशनला कळवले.

हातकणगंले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेस ताब्यात घेवून चौकशी केली. यावेळी सदरची महिला फुगे अन्य वस्तू विकून उपजीविका चालवीत असल्याचे निदर्शनास आले. हातकणगंले पोलीस स्टेशनच्यावतीने अफवावर कोणी विश्वास  ठेवू नये व नागरिकांनी घाबरून जावून नये असे आवाहन केले.

Web Title: Rukdi woman in Kolhapur was beaten and taken into custody by the police on suspicion of abducting children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.