तेरणी ग्रामपंचायतीकडून चाकरमान्यांसाठी नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:12+5:302021-04-19T04:21:12+5:30

गावात कोणाचीही अवहेलना न करता सर्व परतणाऱ्या चाकरमान्यांची योग्य ती दक्षता घेण्यात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर नियमावली जाहीर ...

Rules for Chakarmanyas from Terani Gram Panchayat | तेरणी ग्रामपंचायतीकडून चाकरमान्यांसाठी नियमावली

तेरणी ग्रामपंचायतीकडून चाकरमान्यांसाठी नियमावली

Next

गावात कोणाचीही अवहेलना न करता सर्व परतणाऱ्या चाकरमान्यांची योग्य ती दक्षता घेण्यात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर नियमावली जाहीर केली आहे.

गावात परतणारे चाकरमानी व परगावच्या नागरिकांनी दोन दिवस अगोदर किती व्यक्ती गावी परतणार आहेत, याचाही माहिती द्यावी. गावात येताना शक्य असल्यास कोरोना तपासणी करावी, त्यांचे संस्थात्मक व गृह अलगीकरण करणे, लसीकरण आदींची सोय करण्यात येणार आहे.

गावातील कोणाची नेमणूक केली आहे त्याची नावे व संपर्क मोबाइलनंबरही ग्रामपंचायतीने अन्य नियमांसह या पत्रात केले आहे. गावातील सर्व ग्रुपवर ही नियमावली जाहीर केली आहे.

सरपंच मोसीम मुल्ला, सदस्य करवीर उथळे यांनी सर्वांना सुरक्षित राहून कोणतीही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तेरणीच्या परगावस्थित नागरिकांना केले आहे.

Web Title: Rules for Chakarmanyas from Terani Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.