सत्ताधारी पॅनेलची बाजी

By admin | Published: May 15, 2016 12:44 AM2016-05-15T00:44:31+5:302016-05-15T00:44:31+5:30

खाटीक समाज निवडणूक : चौदा वर्षांनंतर पहिल्यांदा निवडणूक

The ruling panel's bet | सत्ताधारी पॅनेलची बाजी

सत्ताधारी पॅनेलची बाजी

Next

कोल्हापूर : अत्यंत अटीतटीने व अतिशय चुरशीने झालेल्या कोल्हापूर खाटीक समाजाच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री जाहीर होऊन यामध्ये ‘खाटीक समाज विकास आघाडी’ (संयुक्त पॅनेल)ने बाजी मारली. पॅनेलने सर्वच ११ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवत विरोधी ‘खाटीक समाज जनरल मटण मार्केट परिवर्तन पॅनेल’चा पराभव केला. विजयानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल-फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. तब्बल चौदा वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक लागली आहे.
या निवडणुकीसाठी सत्ताधारी ‘खाटीक समाज विकास आघाडी’ (संयुक्त पॅनेल), तर माजी उपमहापौर कै. हरिभाऊ दत्तात्रय प्रभावळकर (बापू) प्रणित ‘खाटीक समाज जनरल मटण मार्केट परिवर्तन पॅनेल’ अशी दोन पॅनेल रिंगणात होती. दोन्ही पॅनेलनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली होती. दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने ११ जागांसाठी ही निवडणूक लागली होती.
लक्ष्मीपुरी येथील कोल्हापूर खाटीक समाजाच्या सभागृहात शनिवारी सकाळी १० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत दिसून आली. एकेका मतासाठी चढाओढ सुरू होती. दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ होती; परंतु मतदारांची संख्या पाहता, प्रत्यक्षात ही प्रक्रिया दुपारी ४.३० च्या सुमारास संपली. एकूण १६६९ पैकी ११८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर काही वेळातच निवडणूक निर्णय अधिकारी ए. एन. शेख यांनी मतमोजणीला सुरुवात केली. बॅलेट पेपर असल्याने मतमोजणी प्रक्रिया धिम्या गतीने सुरू होती. अखेर तब्बल साडेपाच तासांनंतर ही मतमोजणी प्रक्रिया संपली. रात्री दहाच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी शेख यांनी सत्ताधारी पॅनेलचे सर्वच पॅनेल विजयी झाल्याचे घोषित केले. यानंतर सत्ताधारी पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष सुरू केला. विजयी उमेदवारांची नावे व कंसात मिळालेली मते : सर्वसाधारण
धनाजी वसंतराव कोतमिरे -(६११), विजय लक्ष्मणराव कांबळे - (६०८), उत्तम रामचंद्र कांबळे - (५१८), शैलेंद्र बाळासो घोटणे - (५९५), जयदीप विष्णुपंत घोटणे - (५८७),किरण बाबूराव कोतमिरे - (५८४), शिवाजी गणपतराव घोटणे - (५७९), बाळासो गणपती जाधव - (५५४), विलास जानवेकर - (५५१), संजय भोपळे - (५४७), महिला राखीव : मीना शशिकांत प्रभावळे (५६८)

Web Title: The ruling panel's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.