सत्ताधारी संयुक्त आघाडीला ११ जागा

By admin | Published: May 6, 2016 12:42 AM2016-05-06T00:42:13+5:302016-05-06T01:12:14+5:30

सहकारी आघाडीला आठ जागा : बी.एस.एन.एल. कर्मचारी पतसंस्था निवडणूक

The ruling United Front 11 seats | सत्ताधारी संयुक्त आघाडीला ११ जागा

सत्ताधारी संयुक्त आघाडीला ११ जागा

Next

कोल्हापूर : बी.एस.एन.एल. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दिनकर जाधव यांच्या सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडीने ११ जागांवर वर्चस्व राखत विजय मिळविला. मात्र, या निवडणुकीत दिनकर जाधव यांचा पराभव झाला. त्यांच्या विरोधी असणाऱ्या सहकारी आघाडीच्या आठ जागा निवडून आल्या, तर मातृसेवा परिवर्तन आघाडीला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही.
गुरुवारी कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंग येथे सकाळी आठ वाजल्यांपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. बी.एस.एन.एल. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १९ जागांसाठी ही निवडणूक झाली. कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत संस्थेचे १५१० सभासद आहेत. त्यापैकी एकूण एक हजार ३४९ सभासदांंनी मतदानांचा हक्क बजाविला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. ए. ओतारी यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेत अमित महाजन, उदय उलपे, नितीन माने यांंचा सहभाग होता. विजयानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.


सर्वसाधारण गटात विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : अमृत आप्पासो देसाई (६९२), अमृत दत्तात्रय माने (६७७), रणजित शशिकांत माने (६४७), शिवाजी राजाराम तोरसे (६४२), प्रवीण जयसिंगराव घोरपडे (६३३), सुधाकर रामराव भिसे (५८७).
सहकार आघाडी : शिवराम चिदंबर कुलकर्णी (६९५), शंकर दुंडाप्पा मुरगी (६३५), ज्ञानदेव शंकर करपे (६२९), रवींद्र गोपाळ चंदगडकर (६२२), भिकाजी शामराव पाटील (५८८), मदन गणपती खामकर (५८०), सूर्यकांत महिपती कदम (५७९), विनायक शंकर भोसले (५७३).
महिला राखीव गटात : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : गीता सुधाकर पाटील (६४९), विद्या दीपक मंडलिक (५७०). अनुसूचित जाती / जमाती गटात : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : उत्तम बापू कांबळे (६०४), इतर मागासवर्गीय : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : सुभाष गुंडोपंत कारेकर (६६७), भटक्या विमुक्त जाती-जमाती : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : तानाजी भैरू गंधवाले (६३८).

Web Title: The ruling United Front 11 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.