‘लोकमत महामॅरेथॉन’; धावा आणि जिंका एकूण सहा लाखांची बक्षिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:58 PM2019-12-19T18:58:39+5:302019-12-19T19:10:23+5:30
आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त राहण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसºया पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजके दिवस उरले आहेत. नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि. २१) पर्यंत आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिकांनी त्वरित नावनोंदणी करावी.
कोल्हापूर : आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त राहण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसºया पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजके दिवस उरले आहेत. नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि. २१) पर्यंत आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिकांनी त्वरित नावनोंदणी करावी.
येथील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता ‘लोकमत मॅरेथॉन’ची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन’, १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे.
सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. विविध पाच गटांमध्ये होणाºया मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यासह धावपटूंना आकर्षक मेडलही मिळणार आहे. वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होता येईल. सहभागी होणाºयांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा. या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे.
प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य
- ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
मी कधीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला नव्हता. मात्र, सन २०१७ च्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये मी प्रथम सहभागी झालो. या मॅरेथॉनमुळे मी खूप प्रभावित झालो. माझ्या रोजच्या व्यायामासोबत मी धावण्याचा सराव वाढविला. त्यानंतर मी बºयाच मॅरेथॉनमध्ये धावलो. त्यामुळे माझे आरोग्य खूप चांगले झाले असून, माझ्या तणावाच्या कामातही मी ब्लड प्रेशर, शुगरमुक्तआहे. माझ्यामुळे माझे सहकारीदेखील आता मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. आरोग्याचा खूप चांगला मंत्र मला या महामॅरेथॉनमुळे मिळाला, याबद्दल ‘लोकमत’चे मन:पूर्वक आभार मानतो.
- औदुंबर पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी धावणे अथवा चालणे आवश्यक बनले आहे. सध्या सर्वत्र मॅरेथॉनची क्रेझ आहे. ‘लोकमत’ने ही महामॅरेथॉनची संधी कोल्हापूरमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तिचा मला आनंद आहे. त्यामध्ये मी यावर्षीदेखील सहभागी होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये आपण सहभागी होऊन धावण्याचा आनंद घेऊ शकता आणि तंदुरुस्त राहू शकता.
- चेतन चव्हाण,
आयर्नमॅन फिनिशर