रुपा शहा यांचा गाडगे महाराज समाज भूषण पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:35+5:302020-12-25T04:19:35+5:30
प्रा. डॉ. शहा या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेले जवळपास ४० वर्षे कार्यरत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ...
प्रा. डॉ. शहा या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेले जवळपास ४० वर्षे कार्यरत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यावर महिला लोकप्रतिनिधी म्हणूनही उत्तम काम करू शकतात हे दाखवून देण्यासाठी शहा यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवली होती. १९९० ते १९९५ या कालावधीत नगरसेविका म्हणून काम करताना त्यांनी केलेल्या कामांपैकी एक म्हणजे अंबाबाई मंदिराजवळील गाडगे महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण. २५ वर्षांपूर्वी केलेल्या या कामाचे स्मरण गाडगे महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी कायम ठेवले. याची कृतज्ञता म्हणून शहा यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, अध्यासनाचे कार्याध्यक्ष एस. एन. पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
फोटो: २४१२२०२०-कोल-रुपा शहा
फोटो ओळ: कोल्हापुरात संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे डॉ. रुपा शहा यांना समाज भूषण पुरस्काराने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.