ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्जुनवाड्यातच साजरे केले रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:15+5:302021-08-23T04:26:15+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, अर्जुनवाडा (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री मरगाईदेवी व श्री भैरवनाथ मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यासाठी ...
याबाबत अधिक माहिती अशी, अर्जुनवाडा (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री मरगाईदेवी व श्री भैरवनाथ मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यासाठी मंत्री मुश्रीफ सकाळी साडेनऊला गावात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या आया-बहिणींनी व वास्तुशांती सोहळ्यासाठी आलेल्या माहेरवाशिणींनी त्यांचे पंचारतीने औक्षण करून राख्या बांधल्या.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या ४० वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माता- भगिनींचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. या पुण्याईच्या शिदोरीच्या जोरावरच नेहमीच यशस्वी होत आलो आहे. असेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर राहू द्या, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
चौकट.........
दुग्धशर्करा योग........
भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा रक्षाबंधन सण. या सणादिवशीच अर्जुनवाडा ग्रामदैवत श्री मरगाईदेवी व श्री भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण समारंभ म्हणजेच दुग्धशर्करा योग. असा दुर्मीळ योग जुळून आला. घाईगडबडीतही मंत्री मुश्रीफ यांना माता- भगिनींनी राखी बांधून एक अतूट नाते जपले.
फोटोओळी.......
अर्जुनवाडा (ता. कागल) येथे मंदिराच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना राख्या बांधताना माता-भगिनी.
फोटो : संदीप तारळे, गलगले.