ग्रामीण पत्रकारांनी ‘जागल्या’च्या भूमिकेतून आसूड ओढावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:28 AM2021-02-09T04:28:06+5:302021-02-09T04:28:06+5:30
सडोली (खालसा) : पत्रकार हे समाजप्रबोधनाचे विधायक व्यासपीठ असून, पत्रकारांनी वृत्तमूल्यांशी निष्ठा ठेवून समाज हिताचे व्रत जोपासून जागल्याच्या ...
सडोली (खालसा) : पत्रकार हे समाजप्रबोधनाचे विधायक व्यासपीठ असून, पत्रकारांनी वृत्तमूल्यांशी निष्ठा ठेवून समाज हिताचे व्रत जोपासून जागल्याच्या भूमिकेतून गैरप्रवृत्तींविरोधात आसूड ओढावेत, असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी व्यक्त केले. करवीर तालुका पत्रकार संघ व भोगावती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर शिंदे यांचा सपत्नीक जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला. तसेच करवीर भूूूषण पत्रकार पुरस्काराने
सुनील ठाणेकर (पुण्यनगरी), रमेश पाटील (लोकमत), उत्तम पाटील (पुढारी), राजेंद्र पाटील (सकाळ), प्रकाश जाखलेकर ( तरुण भारत), जयवंत निगडे (फोटोग्राफर), कृष्णात निगडे (फोटोग्राफर) यांना सन्मानित केले. सर्जेराव पाटील, प्रकाश चौगले, अध्यक्ष दीपक मेटील, बाबासाहेब देवकर, बबन रानगे, दत्तात्रय मेेेेडसिंगे, के. बी. पाटील, रणजित पाटील, युवराज पाटील, बबन पाटील उपस्थित होते.
फोटो : करवीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने करवीर भूूूषण पुरस्कार ‘लोकमत’चे प्रतिनिधी रमेेश पाटील यांना देऊन गौरविले. यावेेळी प्रभाकर शिंदे, प्रा. जालंदर पाटील, जयसिंग हुजरे, सर्जेराव पाटील, प्राचार्य दिनकर पाटील, दीपक मेटील, युवराज पाटील, बबन पाटील उपस्थित होते.