ग्रामीण डाक सेवकांना विमा कवच मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:46+5:302021-05-05T04:37:46+5:30
संपूर्ण देशात २ लाख ७५ हजार ग्रामीण डाक सेवक कार्यरत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या काळातही शहरी, ग्रामीण भागात जीवाची पर्वा ...
संपूर्ण देशात २ लाख ७५ हजार ग्रामीण डाक सेवक कार्यरत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या काळातही शहरी, ग्रामीण भागात जीवाची पर्वा न करता आणि वेळेचे बंधन सोडून हे डाक सेवक काम करत आहेत. कोरोनामुळे सुमारे २५ ग्रामीण डाक सेवकांचा मृत्यू झाला आहे. या सेवकांना कोरोनाकाळात कोणत्याही प्रकारचे विमा कवच डाक विभागाने दिलेले नाही. त्यामुळे सरकारने ५० लाखांचे कोविड विमा कवच या सेवकांना लागू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती या संघटनेचे सचिव दत्ताजी टिपुगडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
ऑनलाइन खत महोत्सव
कोल्हापूर : येथील एकटी आणि अवनी संस्थेमार्फत ऑनलाइन खत महोत्सव घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अनंत खासबारदार होते. या महोत्सवातून ६०० किलो खताची ऑर्डर शेतकऱ्यांनी दिली. अनुराधा भोसले, रूपाली बाढ, सदाशिव रेडेकर, शोभा रेडेकर, प्रमाेद पुगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पाटील यांनी प्रास्तविक केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी वनिता कांबळे, पूजा शिंदे, प्रसाद शिंदे, सविता कांबळे, मनीषा धमाने, किरण नाईक यांनी परिश्रम घेतले.