एस. एच. पवार यांनी शिवाजी विद्यापीठात संशोधनाची संस्कृती रुजविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:58+5:302021-06-02T04:18:58+5:30

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा. एस.एच. पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ...

S. H. Pawar inculcated a culture of research in Shivaji University | एस. एच. पवार यांनी शिवाजी विद्यापीठात संशोधनाची संस्कृती रुजविली

एस. एच. पवार यांनी शिवाजी विद्यापीठात संशोधनाची संस्कृती रुजविली

googlenewsNext

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा. एस.एच. पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाईन कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. पवार शतायुषी व्हावेत आणि त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही शंभर व्हावी. त्यांनी विद्यापीठात संशोधन प्रकल्प आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली आणि ती संस्कृती रुजवली. त्यांनी विषयांचा प्राधान्यक्रम बदलता ठेवला. त्यामुळे त्यांचा प्रत्येक विद्यार्थी संशोधनाची एक शाळा बनला आहे. त्यांच्या कार्यकाळातच भौतिकशास्त्र विभागाचे देश-विदेशांत संबंध प्रस्थापित झाले असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. माझ्या यशामध्ये माझे पीएच.डीचे मार्गदर्शक डॉ. अनंत नारळीकर यांचा मोठा वाटा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनीही वेळोवेळी मोठे सहकार्य केले, त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. हे विद्यार्थी देश-विदेशात आपापल्या क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करत असल्याचे पाहून समाधान मिळते. यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे प्रा. पवार यांनी सांगितले. सी.एच. भोसले, पी.एन. भोसले, बी. एल. चव्हाण, डी. डी. शिवगण, अर्पिता पांडे, स्वप्निल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू राकेशकुमार मुद्गल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, अधिष्ठाता डॉ. आर.के. शर्मा, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय जाधव, आदी सहभागी झाले. लता एकल यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. एस.बी. कुलकर्णी यांनी आभार मानले.

चौकट

यशस्वी संशोधक झालो

प्र-कुलगुरू प्रा. पी.एस. पाटील यांनी संशोधन कसे करावे, याचा वस्तुपाठ प्रा. पवार यांनी दिल्याने आपण यशस्वी संशोधक झाल्याचे सांगितले. प्रा. सी.डी. लोखंडे यांनी प्रा. पवार यांचा विद्यार्थी हीच आपली खरी ओळख असल्याचे सांगितले. डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी एखादा नवा विषय कसा अभ्यासावा, याचे प्रशिक्षण प्रा. पवार यांच्याकडून मिळाल्याने विविध स्तरावर काम करणे सोपे जात असल्याचे सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी प्रा. पवार यांच्याकडून अखंड ऊर्जेचा स्रोत कसा कायम ठेवावा, हे शिकता आल्याचे सांगितले.

फोटो (०१०६२०२१-कोल- एस एच पवार (विद्यापीठ)

Web Title: S. H. Pawar inculcated a culture of research in Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.