एस. के. रोलरच्या स्केटर्सची लिम्का रेकॉर्ड बुकात नोंद
By admin | Published: June 5, 2015 12:09 AM2015-06-05T00:09:26+5:302015-06-05T00:13:58+5:30
१२१ तासांचा विक्रम : ३ हजार १५० कि.मी. अंतर पूर्ण
कोल्हापूर : बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंगच्या वतीने आयोजित उपक्रमात स्केटर्सनी सलग १२१ तास स्केटिंग करून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली. या विक्रमात कोल्हापुरातील एस. के. रोलर स्केटिंगच्या ५० स्केटर्सनी सहभाग घेतला होता. बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंगच्या रिंगवर घेण्यात आलेल्या या उपक्रमात बेळगावसह कोल्हापुरातील २०० स्केटर्सनी सहभाग घेतला. हा विक्रम नोंदविण्यासाठी हरियाणा, पंजाब, बंगलोर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, आदी भागांतून स्पर्धक आले होते. हा उपक्रम २९ मे ते ३ जून या कालावधीत घेण्यात आला. यामध्ये १५७५३ लॅप्स मारीत स्केटर्सनी ३ हजार १५० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. या विक्रमाची नोंद ‘लिम्का’सह इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, युनिक बुक आॅफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया, इंडियन अचिव्हर्स बुक आॅफ रेकॉर्ड यामध्ये घेण्यात आली.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ कर्नाटकचे क्रीडामंत्री अभयचंद्र जैन यांच्या हस्ते झाला. यावेळी नितीन भंडारी, शिरीष पाटील, ए. डी. शर्मा, सुहास कारेकर, रमेश चिंडक, ज्योती चिंडक, आदी उपस्थित होते.
दरम्यान, या उपक्रमात सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंगच्या आदित्य कुलकर्णी (वय ४), अर्र्पित गरग (८) या स्केटर्सनीही या विक्रमात सहभाग नोंदविला. त्यांना प्रशिक्षक सचिन इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.