सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. नोंदणीबाबत पाच दिवसांत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:22+5:302021-02-08T04:22:22+5:30

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची ३३ वी वार्षिक सभा शिवाजी मंदिर (शिवाजी पेठ) येथे झाली. त्यामध्ये ते बोलत होते. ...

S. for Saundatti Yatra. T. Decision on registration within five days | सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. नोंदणीबाबत पाच दिवसांत निर्णय

सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. नोंदणीबाबत पाच दिवसांत निर्णय

Next

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची ३३ वी वार्षिक सभा शिवाजी मंदिर (शिवाजी पेठ) येथे झाली. त्यामध्ये ते बोलत होते. आमदार चंद्रकांत जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, बेळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांच्या हस्ते रेणुकादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला प्रारंभ झाला. सौंदत्ती येथील पोळ्याची पौर्णिमा यात्रा एक महिना चालते. त्यामुळे यात्रेकरिता रोज २० ते २५ एस. टी. बसेसना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनील जाधव आणि संस्थापक-संचालक सुभाष जाधव यांनी केली. त्यावर रवी एस. कोटरगस्ती यांनी माहिती दिली. त्यासह आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा शालिनी सरनाईक, संचालिका लता सोमवंशी, संस्थापक-संचालक अच्युतराव साळोखे, धनाजी पवळ, केशव माने, दयानंद घबाडे, आनंदराव पाटील, तानाजी बोरचाटे, दीपकराव नलवडे, दीपक जाधव, अजित पाटील, रमेश बनसोडे, तानाजी चव्हाण, आदींसह रेणुका भक्त उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस गजानन विभूते यांनी अहवाल वाचन केले. संचालक अशोकराव जाधव यांनी कार्याचा आढावा सादर केला. चिटणीस युवराज मोळे यांनी आभार मानले.

Web Title: S. for Saundatti Yatra. T. Decision on registration within five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.