एस. टी. पुन्हा फलाटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:46+5:302021-04-13T04:21:46+5:30

कोल्हापूर : दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सकाळपासून एस. टी. बसेस पूर्ण क्षमतेने पुन्हा धावू लागल्या. त्यामुळे सकाळपासूनच प्रवाशांनी ...

S. T. Back on the platform | एस. टी. पुन्हा फलाटवर

एस. टी. पुन्हा फलाटवर

Next

कोल्हापूर : दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सकाळपासून एस. टी. बसेस पूर्ण क्षमतेने पुन्हा धावू लागल्या. त्यामुळे सकाळपासूनच प्रवाशांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात इप्सितस्थळी जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागानेही प्रवाशांना राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी ४०० बसेसची सोय केली होती.

गेल्या दोन दिवसांपासून कडक लाॅकडाऊनमुळे एस. टी. बसने प्रवास करण्याला अगदीच नगण्य प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील गारगोटी, मुरगुड, कागल, इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड या आगारांमध्ये प्रवाशांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे आज (मंगळवारी) साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याची खरेदी करण्यासाठी अनेक प्रवासी बाहेर पडले होते. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे सरकारकडून मोठा लाॅकडाऊन होण्याची शक्यता गृहित धरून अनेकांनी आपल्या इप्सितस्थळी सुरक्षित जाण्यासाठी बसस्थानकांमध्ये गर्दी केली होती. एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागानेही प्रवाशांची मागणी पाहून बसेस उपलब्ध करून दिल्या. रात्री उशिरापर्यंत ये-जा करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होती. गेल्या दोन दिवसात तीन हजार रुपये इतकेही उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले नव्हते. मात्र, सोमवारी दिवसभरात प्रवाशांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महामंडळाला दिवसभरात ३० लाखांहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले.

चौकट

- मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, उस्मानाबाद, बीड, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी मार्गांवर ४०० बसेस रवाना.

- दोन दिवस बसून असलेले एक हजारहून अधिक चालक-वाहक कर्तव्यावर दाखल.

- प्रवाशांकडून कोरोना नियमांची पायमल्ली, अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते.

- इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, कागल, मलकापूर, मुरगुड, गारगोटी, कुरुंदवाड, आदी स्थानकांवर रात्री उशिरापर्यंत गर्दीचे चित्र.

फोटो : १२०४२०२१-कोल-एसटी०१

ओळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी प्रवाशांची विविध ठिकाणी जाण्यासाठी अशी गर्दी झाली होती.

फोटो : १२०४२०२१-कोल-एसटी०२

ओळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासाठी अशी गर्दी केली होती.

Web Title: S. T. Back on the platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.