‘सा. रे.’ पॅनेल बिनविरोध
By admin | Published: July 23, 2014 12:25 AM2014-07-23T00:25:57+5:302014-07-23T00:32:11+5:30
शिरोळ-दत्त कारखाना निवडणूक : कारखान्याच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध
शिरोळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागून राहिलेल्या येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. दत्त साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख आ. डॉ. सा. रे. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे.
७ जुलै २०१४ रोजी दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. २१ जागांसाठी ३२ उमेदवारांचे ७४ अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उत्पादक सभासद मतदारसंघातून १६ जागांसाठी १९ अर्ज शिल्लक राहिले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज, मंगळवारी पहिल्या दिवशी या गटातून बाबूराव महादेव पाटील (इंगळी), इंद्रजित पासगोंडा पाटील (बेडकिहाळ), खानगोंडा लिगोंडा पाटील (बेनाडी) या तिन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे १६ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाला.
या बिनविरोध निवडीची घोषणा २८ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळात पाच
नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून, यामध्ये दोन महिलांना प्रथमच संधी मिळाली आहे, तर दोन विद्यमान संचालकांना वगळण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
-उत्पादक सभासद मतदारसंघ - आ. डॉ. सा. रे. पाटील, गणपतराव आप्पासाहेब पाटील (जांभळी), अनिलकुमार दिनकरराव यादव (शिरोळ), अरुणकुमार शंकर देसाई (सदलगा), विनया रमेश घोरपडे (कुरुंदवाड), विश्वनाथ धोंडी माने (गणेशवाडी), आण्णासाहेब आप्पासो पवार (देसाई इंगळी), बसगोंडा मलगोंडा पाटील (खिद्रापूर), बाबासो शंकर पाटील (अब्दुललाट), प्रमोद वसंत पाटील (अर्जुनवाड), रघुनाथ देवगोंडा पाटील (चंदूर), शेखर कलगोंडा पाटील (धरणगुत्ती), शरदचंद्र विश्वनाथ पाठक (कुन्नूर), युसूफसाहेब रसूलसाहेब मेस्त्री (शिरोळ).
-उत्पादक सभासद अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ - खेमा हणमा कांबळे (बस्तवाड)
-उत्पादक सभासद महिला मतदारसंघ - सौ. यशोदा बाळासो कोळी (उदगाव), सौ. संगीता संजय पाटील-कोथळीकर (कोंडिग्रे)
-सामान्य बिगर उत्पादक आणि सहकारी संस्था मतदारसंघ-रणजित अशोक कदम (शिरदवाड), इंद्रजित पासगोंडा पाटील (बेडकिहाळ).