रोटरी इंटरनॅशनलतर्फे सबला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:53+5:302021-03-13T04:45:53+5:30

कोल्हापूर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकमध्ये शालेय मुलींसाठी ‘सबला’ ...

Sabla venture by Rotary International | रोटरी इंटरनॅशनलतर्फे सबला उपक्रम

रोटरी इंटरनॅशनलतर्फे सबला उपक्रम

Next

कोल्हापूर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकमध्ये शालेय मुलींसाठी ‘सबला’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. फस्ट लेडी उत्कर्षा पाटील आणि साहिल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हा उपक्रम तीन टप्प्यात राबवला जात असून, पहिल्या टप्प्यामध्ये मासिक पाळीबद्दल माहिती दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीन्सचे वाटप होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात सबला बँक करण्यात येणार आहे. तीनही राज्यातील या प्रदेशामध्ये पाच लाख सॅनिटरी नॅपकिन्स वितरित करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी दोन लाख वितरित करण्यात आले आहेत. प्रकल्प अधिकारी अभिजीत पाटील, व्हेतल सोमय्या, अक्षय पुरोहित उपस्थित होते.

Web Title: Sabla venture by Rotary International

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.