‘गोकुळ’च्या जनसंपर्क अधिकारीपदी सचिन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:58+5:302021-05-20T04:26:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून सचिन पाटील (शिरोली दुमाला) यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून सचिन पाटील (शिरोली दुमाला) यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी काम करणारे पी. आर. पाटील यांची बदली दूध प्रकल्प येथे करण्यात आली.
‘गोकुळ’चे जनसंपर्क अधिकारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी संजय दिंडे यांच्या ठिकाणी पी. आर. पाटील यांची नियुक्ती केली होती. ‘गोकुळ’च्या निवडणुकीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन नेत्यांच्या जवळचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या काळात प्रचाराचे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हिटलिस्टवर आहेत. ‘गोकुळ’चा निकाल लागून पंधरा दिवस झाले ताेपर्यंत बदल्याचे सत्र सुरू झाले आहे. जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील यांची दूध प्रकल्प येथे बदली करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी सचिन पाटील यांची नियुक्ती केली आहे. सचिन पाटील यांनी बारा वर्षापूर्वी ‘गोकुळ’मध्ये सुपरवायझर म्हणून सेवेला सुरुवात केली. गेली पाच वर्षे ते अध्यक्ष विश्वास पाटील यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते.
पंधरा जणांच्या बदल्या होणार
‘गोकुळ’मध्ये गेली अनेक वर्षे तळ ठोकून बसलेले अधिकारी व कारभारी कर्मचारी हिटलिस्टवर आहेत. त्यानुसार पंधरा जणांची यादी तयार असून त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.