सादळे़, मनपाडळेत डोंगराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:28+5:302021-04-01T04:26:28+5:30
सादळे मनपाडळे हा डोंगर भाग जंगली झाडे व झुडपांनी वेढला गेला आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मनपाडळे परिसरातून वणवा ...
सादळे मनपाडळे हा डोंगर भाग जंगली झाडे व झुडपांनी वेढला गेला आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मनपाडळे परिसरातून वणवा पेटत आला आणि सादळे मादळे डोंगराला वेढा दिला. या आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयांची गवत व दहा ते पंधरा हेक्टर डोंगर परिसरातील वन संपदा जळून खाक झाली. नैसर्गिक साधन संपत्ती जैवविविधता छोटे-मोठे वृक्ष, फुलपाखरू सरपटणारे प्राणी पक्षी यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. डोंगराळ परिसरातील काही ठिकाणी गवत कापले न गेल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरत गेली. ही आग सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाला लागू नये यासाठी गावातील तरुण वर्ग आग विझविण्यासाठी रात्री प्रयत्न करीत होते.
फोटो ओळी. मनपाडळे सादळे डोंगराला लागलेली आग.