करवीर तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी सदाशिव घाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:29+5:302021-07-17T04:19:29+5:30

गोकुळ शिरगाव : करवीर तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी बोलोली येथील सदाशिव घाटे यांची निवड करण्यात आली. सरपंच ...

Sadashiv Ghate as the President of Karveer Taluka Sarpanch Seva Sangh | करवीर तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी सदाशिव घाटे

करवीर तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी सदाशिव घाटे

Next

गोकुळ शिरगाव : करवीर तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी बोलोली येथील सदाशिव घाटे यांची निवड करण्यात आली. सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच सेवा संघाचे राज्य मार्गदर्शक नारायण पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीर तालुका सरपंच सेवा संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष वसंत पांडुरंग तोडकर (वाकरे), योगेश संभाजी ढेंगे (नागदेवाडी). महिलाध्यक्ष शालन बाबुराव पाटील (देवाळे) व महिला उपाध्यक्ष पूनम उत्तम परीट (घानवडे), सालाप्पा विठ्ठल चौगुले (सरचिटणीस - मांजरवाडी), सर्जेराव बाबू तिबिले (प्रसिध्दीप्रमुख - बीड), एकनाथ भाऊ वरुटे (संघटक) तर अमर कृष्णात व्हायकर (सहसंघटक), प्रकाश शामराव शेटे (कोषाध्यक्ष), मयूर मधुकर जांभळे (जिल्हा परिषद गटप्रमुख) यांची निवड करण्यात आली.

Web Title: Sadashiv Ghate as the President of Karveer Taluka Sarpanch Seva Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.