लहान मुले चोरीकरणारी टोळी म्हणून पकडलेल्या साधूंची चौकशीअखेर पोलिसांनी केली सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 08:22 PM2023-01-30T20:22:06+5:302023-01-30T20:23:03+5:30

लहान मुले चोरीकरणारी टोळी म्हणून पकडलेल्या साधूंची पोलिसांनी चौकशीनंतर सुटका केली. 

 Sadhus who were caught as a child stealing gang were released by the police after interrogation  | लहान मुले चोरीकरणारी टोळी म्हणून पकडलेल्या साधूंची चौकशीअखेर पोलिसांनी केली सुटका 

लहान मुले चोरीकरणारी टोळी म्हणून पकडलेल्या साधूंची चौकशीअखेर पोलिसांनी केली सुटका 

googlenewsNext

(सुनिल चौगले) 
आमजाई व्हरवडे (कोल्हापूर)
: गोवर्धन मंहत बाल योगी नागा बाबा आश्रम मथुरा येथून तीन साधू व चालक यांना लहान मुले चोरणारी टोळी समजून आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे पकडलेल्या तिन सांधूना राधानगरी पोलसांनी चौकशी करुन सोडून दिले. याबाबत माहिती अशी की UP21p 3002 या गोल्डन कलरच्या महिद्रा मार्शल मधून मथुरेहून तिन साधू व व चालक कोल्हापूरहून राधानगरीकडे येत असता कांडगाव ता करवीर येथे मुख्य रस्त्यावर थांबून एका लहान मुलांकडे गणपतीपुळेला जाण्याचा रस्ता विचारत होते

ते हिंदी भाषेत बोलत असल्यामुळे लहान मुलाने आरडा ओरड करत धुम ठोकून घरी आला घरच्यांना सांगितले घरच्याच्याही लक्षात न आल्याने पाच सहा लोक पळतच गाडीजवळ आले लोक गाडीच्या दिशेने पळत येत असल्याचे पाहून सांधूनी सुसाट तेथून पलायन केले. त्यामुळे ग्रामस्थांना अधिकच शंका आल्याने त्यांनी करवीर पोलिसांना याबाबत सांगितले.

करवीर पोलिसांनी राधानगरी पोलिसांना सुचना करत गाडीचे वर्णन सांगत ही गाडी थांबवण्याच्या सुचना केल्या. राधानगरी पोलीसांनी प्रत्येक गावच्या पोलिस पाटलांना सुचना देत वरील वर्णणाची गाडी थांबवण्याच्या सुचना केली. आवळी बुद्रुक येथे सांगितलेल्या वर्णणाची गाडी येताच गाडीतून या सांधूना उतरुन ग्रमपंचायत कार्यलयात थांबवण्यात आले पोलीस पाटील नामदेव पोवार यांनी यांनी राधानगरी पोलीसांना कळवून घटनास्थळी येण्यास सांगितले .

लहान मुले चोरीकरणारी टोळी असल्याची आफवा पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. राधानगरी पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेत अधिक चौकशी केली चौकशीत मथुरेहून हे साधू गणपतीपुळेला जाण्यासाठी निघाले होते हे स्पष्ट झाल्याने त्यांना सोडून मार्ग दाखवण्यात आला. 

 

Web Title:  Sadhus who were caught as a child stealing gang were released by the police after interrogation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.