भगवे, निळे झेंडे एकत्र फडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:55 AM2018-04-13T00:55:05+5:302018-04-13T00:55:05+5:30

Saffron and blue flags together | भगवे, निळे झेंडे एकत्र फडकणार

भगवे, निळे झेंडे एकत्र फडकणार

Next


गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा निर्णय घेतला आहे.
भीमा-कोरेगाव या प्रकरणानंतर दोन्ही समाजातील मतभेद वाढले आणि दोन्ही समाजाचे न भरून निघणारे नुकसान झाले. जयंती साजरी करण्याचा चंग बांधलेले भीमसैनिक आणि शिवभक्त मिरवणुकीची परवानगी मागण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात गेले असता येथील स.पो.नि. सुशांत चव्हाण यांनी शिवभक्त आणि भीमभक्तांची एकत्र बैठक बोलावून रयतेचे राजे शिवछत्रपती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रयतेबाबतचे कार्य अलौकिक आहे. त्यांचा देशभरातील प्रत्येक नागरिकांनी सन्मान केला पाहिजे. या महामानवांची वैचारिकता प्रत्येकाने अंगिकारली तर समाजामधील निर्माण होणारे तेढ थांबेल आणि समाजा-समाजामध्ये सामाजिक बांधीलकी, आपुलकी रुजेल, असे सांगितले. त्या दरम्यान शिवभक्त आणि भीमभक्तांनी येणाऱ्या दोन्ही महामानवांच्या जयंती या पारंपरिक पद्धतीने साजºया करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे जातीय तेढ कमी होऊन समाज प्रबोधनांचा संदेश जाऊन सलोख्याचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. गांधीनगरचे
स. पो. नि. सुशांत चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर गावांतील महामानवांच्या अनुयानांनाही विचार करायला लावणारे पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
बैठकीला जितेंद्र कुबडे, लखन कांबळे यांनी या महामानवांच्या जयंती ज्या-त्या दिवशी प्रतिमापूजन करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत ग्रा. पं. सदस्य विक्रम मोहिते, अनिल उपाध्ये, बाबासाहेब नेर्ले, भटक्या विमुक्त गोसावी समाजाचे अध्यक्ष उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी धर्मेंद्र जाधव, गणेश सरवदे, अभिजित अवघडे, विजय मनचुडिया, नितीन धनवडे, हरीष पोवार, पप्पू श्ािंदे, राजा इनामदार, विकी बेनाडे, विशाल फुले, रोशन निरंकारी, विवेक कोलप यांच्यासह विविध मंडळांनी मिरवणुकीस पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title: Saffron and blue flags together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.