सागरचे रौप्यपदक चिमुकल्या नारायणीला

By admin | Published: June 15, 2017 01:12 AM2017-06-15T01:12:08+5:302017-06-15T01:12:08+5:30

राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण : ‘अग्निदिव्य’ नाटकाचे सादरीकरण

Sagar's silver medal, Chimukala, Narayani | सागरचे रौप्यपदक चिमुकल्या नारायणीला

सागरचे रौप्यपदक चिमुकल्या नारायणीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ५६व्या महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पारितोषिक वितरण मंगळवारी (दि. १३) पुण्यात झाले. यावेळी स्पर्धेच्या अंतिम फेरीत हृदयस्पर्श संस्थेच्यावतीने ‘अग्निदिव्य’ नाटक सादर करताना रंगमंचावरच एक्झिट घेतलेले अभिनेते सागर चौगुले यांना जाहीर झालेले मरणोत्तर रौप्यपदक त्यांच्या चिमुकल्या नारायणीने स्वीकारले. यानिमित्ताने सहकलाकार सागरच्या आठवणींना उजाळा देताना सभागृहातील उपस्थित मान्यवर व श्रोत्यांच्या डोळ््यांच्या कडाही ओलावल्या.
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. १३) पुण्यातील भरत नाट्यमंदिरात झाला. यावेळी अभिनेत्री लीना भागवत यांनी सागरला जाहीर झालेले रौप्यपदक त्यांची चिमुकली मुलगी नारायणीच्या गळ््यात घातले. यावेळी सागरच्या पत्नी वनिता चौगुले, दिग्दर्शक सुनील माने, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे यांच्यासह नाटकाची टीम उपस्थित होती. यावेळी पद्माकर कापसे यांनी निर्मितीसाठीचे वीस हजार रुपयांच्या पारितोषिकाची रक्कम यावेळी सागर चौगले यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले. या नाटकाला एकूण पाच वैयक्तिक बक्षिसे मिळाली.
 

Web Title: Sagar's silver medal, Chimukala, Narayani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.