कचऱ्याच्या खतापासून बनविला आॅक्सिजन प्लांट संगीता पाडळकर : परिसर फुलला झाडांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:02 AM2017-06-28T00:02:15+5:302017-06-28T00:02:15+5:30

आम्ही जगवली झाडे..!

Sageeta Padalkar, an oxygen plant made from waste manure | कचऱ्याच्या खतापासून बनविला आॅक्सिजन प्लांट संगीता पाडळकर : परिसर फुलला झाडांनी

कचऱ्याच्या खतापासून बनविला आॅक्सिजन प्लांट संगीता पाडळकर : परिसर फुलला झाडांनी

Next

शेखर धोंगडे ।   लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राहायला कचरा डेपोच्या समोरच. दररोजच कचऱ्याचे डोंगर पाहणे व दुर्गंधीच्या वासापासून सुटका करण्यासाठी स्वत:च्याच जागेत सुंदर फूलझाडे, फळझाडे लावून ३ वर्षांत दोनशेहून अधिक झाडे जगविली व ती आता फळे व फुले देऊ लागल्याचे संगीता तानाजी पाडळकर अभिमानाने सांगतात.
पती तानाजी पाडळकर हे महापालिकेत विभागीय आरोग्य निरीक्षकपदी कार्यरत असल्याने २७ वर्षे त्यांचे वास्तव येथील ड्रेनेज प्लांट कॉलनीतच आहे. घरासमोर कचरा डेपो, प्रदूषणाचा त्रास यामुळे जगणे नकोसे झाले होते. त्यामुळे पती तानाजी यांच्याकडून व स्वत:ची आवड जपत कचऱ्यातून खत व बगीचा कसा फुलवायचा याची संगीता पाडळकर यांनी माहिती घेतली. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी अंगणात भव्य असा आॅक्सिजन प्लांट साकारला.
आता ही सर्व झाडे दीड फुटापासून ते तीस फुटांपर्यंत सुंदररीत्या वाढली आहेत. संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून, वातावरण प्रसन्न व सुंगधी झाल्याचे संगीता पाडळकर सांगतात. कुंभार समाजाचा वारसा जपत सुबक-आकर्षक गणेशमूर्ती साकारण्याची कलाही त्यांनी अवगत करीत, ५०० पेक्षा अधिक गणेशमूर्ती घडविल्या आहेत.


कुटुंबात जसे आपण ‘हम दो हमारा एक’ या नियमानुसार वागतो, तसेच ‘हम दो हमारे पाच पेड’ असे वागल्यास पर्यावरणाचा ऱ्हास व प्रदूषण थांबेल. फक्त संकल्प करून कुटुंबातील सदस्याप्रमाणे झाडे जिद्दीने जगवा, तरच आपलेही जीवन झाडांप्रमाणेच फुलेल, बहरेल. सभोवतालचा परिसर प्रसन्न राहील.
- संगीता पाडळकर,
लाईन बाजार, कोल्हापूर.


नवे जीवन, नवी आशा
दररोज जळता कचरा व त्यापासून होणारा आरोग्याचा त्रास आता या आॅक्सिजन प्लांटमुळे कमी झाला असून, या छोट्या दाट हिरवाईने पाडळकर यांच्या प्लॉटमध्ये नव्याने जगण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. तुम्हीही जगा व झाडांना जगवा, असा संगीता पाडळकर संदेश देतात.


लावलेली झाडे
नारळ, आंबा, अंजीर, डाळिंब, आवळा, चिकू, केळी, पपई, पेरू, जांभूळ, सीताफळ, फणस, लिंबू, रामफळ अशा फळझाडांसह कडूलिंब-तुळस व विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, वेल तसेच विविध प्रकारच्या रंगांतील व वैविध्यपूर्ण जातीचे गुलाब, चाफा, सदाफुली, जास्वंदीची झाडे बहरली आहेत. जोडीला दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यामध्ये कांदा, भेंडी, मटकी, वांगी चवळी, दुधी भोपळा, दोडकाही उत्तमरीत्या पिकविल्याचे दिसते. सर्वसाधारण १२५ पेक्षा विविध जातींची झाडे येथे फुलली आहेत.


 

Web Title: Sageeta Padalkar, an oxygen plant made from waste manure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.