साहित्यानंद प्रतिष्ठानचे ऑनलाईन काव्यसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:31 AM2021-09-08T04:31:05+5:302021-09-08T04:31:05+5:30
या संमेलनात संजना जुवाटकर (ठाणे), तानाजी बिरनाळे (बेळगाव), अमोल तांबे (सिंधुदुर्ग), काजल आवटे (बेळगाव), शरद कदम (रोहा), नीशा दळवी ...
या संमेलनात संजना जुवाटकर (ठाणे), तानाजी बिरनाळे (बेळगाव), अमोल तांबे (सिंधुदुर्ग), काजल आवटे (बेळगाव), शरद कदम (रोहा), नीशा दळवी (रायगड), अमोल चौगुले (बेळगाव), सत्तापा सुतार (बेळगाव), संतोष पाटील (बेळगाव), विशाल सुतार (बेळगाव), दादा जनवाडे (बेळगाव), स्मिता भद्रिगे (अंबरनाथ, ठाणे) यांनी सहभाग घेत कविता सादर केल्या.
साहित्यानंद प्रतिष्ठान हे संपूर्ण महाराष्ट्रात साहित्य, संगीत क्षेत्रात काम करते. बेळगाव जिल्ह्यातही ही संस्था काम करते. संतोष पाटील हे बेळगाव जिल्हा अध्यक्ष असून, यापूर्वीही त्यांनी कवी संमेलन आयोजित केले होते.
सहभागी कवींनी उत्कृष्ट कविता सादर करून संमेलनात रंग भरला. साहित्यानंद प्रतिष्ठानच्यावतीने सहभागी कवींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत कदम व विजय वडवेराव यांनी मनोगत व्यक्त केले. दादा जनवाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष पाटील यांनी आभार मानले.