साई भाई गॅंगचा गुंड विशाल वडर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:21+5:302021-09-07T04:29:21+5:30

कोल्हापूर : राजारामपुरीतील साई भाई गॅंगमधील मोकांतर्गत दाखल गुन्ह्यातील परागंदा असलेल्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी अटक ...

Sai Bhai Gang's goon Vishal Vadar Gajaad | साई भाई गॅंगचा गुंड विशाल वडर गजाआड

साई भाई गॅंगचा गुंड विशाल वडर गजाआड

कोल्हापूर : राजारामपुरीतील साई भाई गॅंगमधील मोकांतर्गत दाखल गुन्ह्यातील परागंदा असलेल्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी अटक केली. विशाल प्रकाश वडर (वय २४ए रा. १४१६ ई वॉर्ड, शाहूनगर, राजारामपुरी) असे त्याचे नाव असून हॉटेल मालकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्यासह अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. गेले सात महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहू टोल नाक्यानजीक एका हॉटेल व्यावसायिकांचा पाठलाग करून त्यांच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले होते. हल्ल्यात त्याच्या मोटारीचीही मोडतोड केली होती. याप्रकरणी राजारामपुरीतील साई भाई गॅंगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करत पाच जणांना यापूर्वी अटक केली आहे. विशाल वडर हा फरारी होता, तो गेले सात महिने पोलिसांना गुंगारा देत होता.

विशाल वडर हा पुलाची शिरोली येथील पिरबालेसाहेब बाबा दर्गानजीक येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळालीण त्यानुसार पोलीस पथकाने सोमवारी दुपारी पुलाची शिरोली परिसरातील दर्गा परिसरात सापळा रचला. तो आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल आहेत.

फोटो नं. ०६०९२०२१-कोल-विशाल वडर (आरोपी)

060921\06kol_10_06092021_5.jpg

फोटो नं. ०६०९२०२१-कोल-विशाल वडर (आरोपी)

Web Title: Sai Bhai Gang's goon Vishal Vadar Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.