साई चषक ‘महाराष्ट्र’ कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:07+5:302021-03-22T04:22:07+5:30
मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ‘महाराष्ट्र’कडून राजगुरू जगदाळे व पृथ्वीराज कदम यांनी गोल केले. राजर्षी ...
मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ‘महाराष्ट्र’कडून राजगुरू जगदाळे व पृथ्वीराज कदम यांनी गोल केले. राजर्षी छत्रपती शाहूकडून ऋतुराज कदम याने एकमेव गोल केला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यांत दोन्ही संघांकडून आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन झाले. तत्पूर्वी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीत ‘महाराष्ट्र’ने देवगिरी फायटर्स संघाचा ५-० असा एकतर्फी पराभव केला होता. त्यात पृथ्वीराज खोत, तन्मय जाधव, प्रणव चौगुले, अनिरुद्ध पाटील, पृथ्वीराज कदम यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात राजर्षी छत्रपती शाहू स्पोर्टस्ने तुल्यबळ छावा मित्र मंडळचा २-० असा पराभव केला. त्यात ‘शाहू’कडून ऋतुराज कदम, आयूष चौगुले यांनी गोल केले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ अमित शिंदे, संजीवकुमार, विजय साळोखे (सरदार), सुदाम तोरस्कर, अविनाश गवळी, राजू गवळी, समीर जाधव, मिलिंद शेलार, सागर जाधव, नजीर मुल्ला, ओंकार भांडवले यांच्या उपस्थितीत झाला. स्पर्धेतील विजेत्या संघास श्रीपतराव शिंदे यांच्या स्मरणार्थ चषक व रोख तीन हजार रुपये देण्यात आले., तर उपविजेत्या संघास दोन हजार व चषक देण्यात आला.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू असे,
उत्कृष्ट गोलरक्षक - स्वप्निल कुराडे (राजर्षी शाहू स्पोर्टस्), उत्कृष्ट बचावपटू - प्रणव सूर्यवंशी (सरदार स्पोर्टस्), आघाडीवीर- तन्मय जाधव , हाफ - प्रणव चौगुले (दोघेही महाराष्ट्र क्रीडा मंडळ), (महाराष्ट्र क्रीडा मंडळ), सामनावीर - पारस पाटील (राजर्षी शाहू), प्रज्ज्वल पाटील, शाहू चौगुले, विवेक दुर्गुळे, विनायक हांडे, (उदयोन्मुख खेळाडू)
फोटो : २१०३२०२१-कोल-हाॅकी
आेळी : मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियममध्ये जिल्हा हाॅकी असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या साई चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या महाराष्ट्र क्रीडा मंडळास अमित शिंदे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.