आर्थिक वादातून सैनिक टाकळीच्या युवकाचा निपाणीत निर्घृण खून, एका संशयितास घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:46 AM2022-04-04T11:46:47+5:302022-04-04T11:51:00+5:30

घराच्या दारातच दबा धरून बसलेल्या तिघा जणांनी आर्थिक व्यवहारातून अभिषेकशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी चाकूने हल्ला चढवला.

sainiki Takli's youth murdered in financial dispute, one suspect arrested | आर्थिक वादातून सैनिक टाकळीच्या युवकाचा निपाणीत निर्घृण खून, एका संशयितास घेतलं ताब्यात

आर्थिक वादातून सैनिक टाकळीच्या युवकाचा निपाणीत निर्घृण खून, एका संशयितास घेतलं ताब्यात

Next

निपाणी : चित्रपट गृहात काम करणाऱ्या युवकाचा चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना काल, रविवारी मध्यरात्री निपाणी येथील निराळे गल्ली येथे घडली. अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय-२१, रा. सैनिक टाकळी ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आर्थिक वादातून तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला.

या घटनेची माहिती अशी की, अभिषेक हा सैनिक टाकली येथील रहिवासी असून निपाणी येथील चित्रपट गृहात तो काम करतो.  तो आपल्या आईसह येथील निराळे गल्लीत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तो चित्रपटगृहातील काम आटोपून आपल्या घरात प्रवेश करीत असताना दारातच दबा धरून बसलेल्या तिघा जणांनी आर्थिक व्यवहारातून अभिषेकशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी चाकूने हल्ला चढवला. या हल्यात अभिषेक याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी एका संशयिताला शहर पोलिसांनी  ताब्यात घेतले असून अन्य दोघे संशयित फरार झाले आहेत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  घटना घडल्यानंतर निपाणी पोलिसांनी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.  ठाणे अंमलदार रमेश तळवार, हवालदार विनोद असोदे यांच्यासह उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांची जादा कुमक मागवून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला.

घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: sainiki Takli's youth murdered in financial dispute, one suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.