‘शिवविद्या प्रबोधिनी’च्या सराव परीक्षेत लागला विद्यार्थ्यांचा कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 06:34 PM2017-07-30T18:34:39+5:302017-07-30T18:35:07+5:30
कोल्हापूर : शिवविद्या प्रबोधिनी, बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे कोल्हापुरात रविवारी घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सराव परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागला. यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते.
कोल्हापूर : शिवविद्या प्रबोधिनी, बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे कोल्हापुरात रविवारी घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सराव परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागला. यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते.
येथील गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात ‘शिवविद्या प्रबोधनी’तर्फे संबंधित सराव परीक्षा घेण्यात आली. यासाठी सकाळी सव्वाअकरा ते दुपारी सव्वा या वेळेत ९० प्रश्न असलेले एकूण २०० गुणांचा पेपर होता. यूपीएससी अभ्यासक्रमावर प्रश्नांचा यात समावेश होता. इंग्रजी माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांचा कस लागला.
दरम्यान, या परीक्षेचा प्रारंभ होण्यापूर्वी ‘शिवविद्या प्रबोधिनी’चे संस्थापक-संचालक व शिवसेना उपनेता विजय कदम यांनी यूपीएससीच्या परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची त्यांनी माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे, रवी चौगुले, पप्पू नाईक, विकास नेसरीकर, आदी उपस्थित होते.
विनामूल्य प्रशिक्षण
‘यूपीएससी’मध्ये महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेनेने या ‘शिवाविद्या प्रबोधिनी’ची स्थापना केली आहे. या प्रबोधिनीतर्फे सराव परीक्षा घेऊन यातील निवडक ५० विद्यार्थ्यांना कोल्हापुरात वर्षभर विनामूल्य मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली. ते म्हणाले, आज झालेल्या परीक्षेचा निकाल २ आॅगस्टला जाहीर होईल. यानंतर मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.