महेच्या सरपंचपदी काँग्रेसचे सज्जन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:33 AM2021-02-26T04:33:44+5:302021-02-26T04:33:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : महे (ता. करवीर) गावच्या सरपंचपदी काँग्रेस पक्षाचे सज्जन तुकाराम पाटील यांची, तर उपसरपंचपदी रूपाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : महे (ता. करवीर) गावच्या सरपंचपदी काँग्रेस पक्षाचे सज्जन तुकाराम पाटील यांची, तर उपसरपंचपदी रूपाली युवराज बोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या सभागृहात आज गुरुवारी झालेल्या बैठकीत ही निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गुरव होते .
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागांपैकी ९ जागा मिळून सत्ता आमदार पी. एन. पाटील गटाला प्राप्त झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य एस. डी. जरग, हणमंत पाटील, शामराव कुंभार, सुवर्णा पाटील, स्वप्नाली हुजरे-पाटील, सविता कांबळे, मनीषा पाटील, कृष्णात कांबळे, काजल बोराटे यांच्यासह तलाठी शुभांगी डोंगरे, पोलीसपाटील इंदूबाई हुजरे, सर्जेराव हुजरे, कृष्णात ठाणेकर, बाजीराव जरग, पांडुरंग पाटील, पंडित पाटील, सर्जेराव नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले. जगदीश पाटील यांनी आभार मानले
२५ सज्जन पाटील, २५ रूपाली बोराटे