कसबा बीड येथे साकारतेय प्राचीन वीरगळांचे वस्तुसंग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:27+5:302020-12-08T04:21:27+5:30

सावरवाडी : बाराव्या शतकातील भोजराजाची पवित्र राजधानी म्हणून ख्याती असलेल्या कसबा बीड (ता. करवीर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्राचीन ...

Sakarteya Ancient Veergala Museum at Kasba Beed | कसबा बीड येथे साकारतेय प्राचीन वीरगळांचे वस्तुसंग्रहालय

कसबा बीड येथे साकारतेय प्राचीन वीरगळांचे वस्तुसंग्रहालय

googlenewsNext

सावरवाडी : बाराव्या शतकातील भोजराजाची पवित्र राजधानी म्हणून ख्याती असलेल्या कसबा बीड (ता. करवीर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्राचीन कोरीव लेणी, राजघराण्यातील पराक्रमी वीरांच्या वीरगळांचे भव्य वस्तुसंग्रहालय साकारते आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळणार आहे. गावच्या प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीमध्ये नव्या इतिहासात भर पडणार आहे . प्राचीन संस्कृतीचे नवे दालन पर्याटकांसाठी खुले होणार आहे.

कसबा बीड गावाला प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा आहे. ग्रामदैवत शंभो महादेव मंदिर परिसरात गावाच्या परिसर, शेती येथे विखुरलेल्या अवस्थेत असलेले प्राचीन एकाच पाषाणावर कोरीव वीरगळ एकत्र करून त्यांचे स्मारक व्हावे हा विचार ग्रामस्थांत होता. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कोल्हापूरच्या शिवशक्ती प्रतिष्ठान व कसबा बीड गावच्या यंग ब्रिगेट यांच्या अथक प्रयत्नातून गेल्या दोन वर्षांत गावच्या परिसरातील प्राचीन वीरगळ एकत्र करण्यात आले. प्राचीन काळातील दुर्मीळ वीरगळ एकत्र करून ठेवल्याने त्याची माहिती नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे.

गावातील शेती, ओढे, नदीकाठावरील, मंदिर, अनेक ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेतील प्राचीन वीरगळ एकत्र करून त्यांचे प्राचीन वस्तुसंग्रहलय कसबा बीड ग्रामदैवत शंभो महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आले. या प्राचीन बाराव्या शतकातील वीरगळांचे संवर्धन करण्यात आले.

प्राचीन पाषाणी वीरगळाच्या प्राचीन इतिहासाचे महत्त्व नव्या पिढीला माहिती व्हावे या हेतूने वस्तुसंग्रहालय उभारले आहे. सुमारे दीड लाख रुपये लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी खर्च केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील असे हे एकमेव वस्तुसंग्रहालय असून, याकडे ग्रामीण पर्यटक आकर्षित होऊ लागले आहेत. या प्राचीन वीरगळ वस्तुसंग्रहालयामुळे भोजराजाची नगरी जगाच्या नकाशावर येऊ लागली आहे.

चौकट -

शासकीय निधीची गरज

प्राचीन संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी प्राचीन दुर्मीळ या वस्तुसंग्रहालयास शासकीय निधीची गरज आहे. दुर्मीळ वीरगळांचा संग्रह करून त्यांचे भव्य संग्रहालय उभारल्यावर परिसरात विकासकामे करणे गरजेचे आहे .

कोट = प्राचीन वीरगळ वस्तुसंग्रहालयामुळे गावाचे महत्त्व वाढणार . !

कसबा बीड भूमी ही भोजराजाची ऐतिहासिक प्राचीन राजधानी आहे. या गावचा प्राचीन इतिहास जगासमोर येत आहे. पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे .

सत्यजित पाटील

(सरपंच व गोकुळ दुध संघ विद्यमान संचालक )

(फोटो ओळ = कसबा बीड (ता. करवीर) येथील ग्रामदैवत शंभो महादेव मंदिर परिसरात बाराव्या शतकातील प्राचीन वीरगळांचे वस्तुसंग्रहालय साकारते आहे.

Web Title: Sakarteya Ancient Veergala Museum at Kasba Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.