महात्मा फुले सूतगिरणी कर्मचाऱ्यांना पगारवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:08+5:302021-03-19T04:22:08+5:30
पेठवडगाव : येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रशासनाने कोरोना, आर्थिक मंदी अशा परिस्थितीतही कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द ...
पेठवडगाव : येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रशासनाने कोरोना, आर्थिक मंदी अशा परिस्थितीतही कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळत सरासरी १० ते १२ टक्के एवढी पगारवाढ केली. ही पगारवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
संस्थाध्यक्ष व आमदार राजूबाबा आवळे यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा शब्द दिला होता; पण कोरोना महामारी, इतर परिस्थितीमुळे पगारवाढ काही दिवस लांबणीवर पडली होती. गुरुवारी यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
देशभरात सगळीकडे नोकरी जाणे, पगार कपात असे निराशेचे वातावरण असताना, महात्मा फुले सूतगिरणीच्या प्रशासनाने दिलेल्या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वीही प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळातील मार्च २० ते एप्रिल २० महिन्यांचा पगार दिला होता. या पगारवाढीबद्दल कामगार संघटनेच्या वतीने आमदार राजू आवळे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी प्रॉडक्शन मॅनेजर संतोष भोसले, एच. आर. मॅनेजर गजानन हर्षे (कांबळे), कामगार युनियन अध्यक्ष दिग्विजय शिंदे, उपाध्यक्ष सचिन खाडे, सचिव आदिल मुल्ला, अनिल सावंत, अनिल शिंदे, आझाद मुल्लाणी, प्रकाश जाधव पाटील, संजय चाळके, संदीप पाटील, दीपक चौगुले, राजाराम कांबळे, राजकिशोर खांबे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : पेठवडगाव : येथील महात्मा फुले सूतगिरणी येथे कर्मचाऱ्यांना पगारवाढ केल्याबद्दल अध्यक्ष, आमदार राजू आवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष भोसले, गजानन हर्षे (कांबळे), दिग्विजय शिंदे, सचिन खाडे, आदिल मुल्ला, आदी उपस्थित होते.
१८ आवळे मिल