प्लास्टिक पिशव्यांची विक्री, १५ विक्रेत्यांना दंड बंदी असतानाही विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:34 AM2018-09-07T00:34:49+5:302018-09-07T00:36:21+5:30
प्लास्टिक व थर्माकोल विक्रीस बंदी असतानाही राजरोसपणे प्लास्टिकची विक्री करणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या परिसरातील १५ विक्रेत्यांवर छापे टाकून गुरुवारी महानगरपालिका आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी प्लास्टिक पिशव्या जप्त
कोल्हापूर : प्लास्टिक व थर्माकोल विक्रीस बंदी असतानाही राजरोसपणे प्लास्टिकची विक्री करणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या परिसरातील १५ विक्रेत्यांवर छापे टाकून गुरुवारी महानगरपालिका आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या; तसेच विक्रेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड केला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.
सुरुवातीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात अनेक ठिकाणी दुकानांवर छापे टाकले. प्लास्टिक पिशव्यांचे साठे जप्त केले. अनेक विक्रेते, उत्पादक यांना दंड केला. गुरुवारी महापालिका आरोग्य विभाग तसेच महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी अंबाबाई मंदिर परिसरात संयुक्तपणे छापे टाकून प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया १५ विक्रेत्यांना पिशव्या विक ताना पकडले. त्यांना प्रत्येक पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सर्वांकडून ७५ हजार रुपये वसूल करण्यात आले.
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ए. डी. मेवेकरी, महालक्ष्मी प्रसाद पूजा, रेवणकर ज्वेलर्स, रक्स पूजा सेंटर, अभिषेक लिंगायत, कोल्हापूर केशरी पेढे, एम. डी. मेवेकरी, महालक्ष्मी पूजा सेंटर, बालाजी झेरॉक्स, पेरिना ग्राहक सेवा मंडळ, न्यू राष्टÑीय लेदर, केशरी पेढे, जगदेव पूजा ओटी सेंटर, कोल्हापूर मध्यवर्ती ग्राहक भांडार, वैभव स्टोअर्स यांचा समावेश आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या परिसरात प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यात आली.