विक्रीकर सहाय्यक आयुक्त संजय माने लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 04:19 PM2017-09-20T16:19:01+5:302017-09-20T16:25:08+5:30
विक्रीकर सहाय्यक आयुक्त संजय माने यांना २०००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली. संबंधित व्यापाºयाच्या तक्रारीवरुन पथकाने ही कारवाई केली.
Next
ठळक मुद्देसापळा रचून पकडले जाळ्यात संजय माने यांना अटक व्यापाºयाच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाई २०००० रुपयांची लाच घेताना पकडले
कोल्हापूर : विक्रीकर सहाय्यक आयुक्त संजय माने यांना २०००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली. संबंधित व्यापाºयाच्या तक्रारीवरुन पथकाने ही कारवाई केली.
एका व्यापाºयाकडे विक्रीकर सहाय्यक आयुक्त संजय माने यांनी ५०००० रुपयांची लाच मागितली होती. गेले दोन दिवस माने व्यापाºयाकडे पैशाची मागणी करीत होते. त्यांच्या या मागणीला कंटाळून अखेर व्यापाºयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गिरीष गोडे यांनी सापळा रचून त्यांना जाळ्यात पकडले. संजय माने यांना अटक करण्यात आली आहे.