मुंबईतील ‘गोकुळ’ची विक्री २० हजार लिटरने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:17+5:302021-07-20T04:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुंबईत रविवारपासून धुवाधार पाऊस सुरू असून अख्खी मुंबई तुंबली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुंबईत रविवारपासून धुवाधार पाऊस सुरू असून अख्खी मुंबई तुंबली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून दूध वितरणावर त्याचा परिणाम झाला आहे. ‘गोकुळ’ दूध संघाच्या दूध विक्रीत सोमवारी वीस हजार लिटरची घट झाली आहे.
मुंबईसह कोकणात गेली दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत तर हाहाकार झाला असून रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे वाहतूक यंत्रणा काहीसी विस्कळीत झाली आहे. त्याचा दूध वितरणावरही परिणाम झाला असून रविवारी ‘गोकुळ’ची विक्री ३० हजार लिटरने कमी झाली. मुंबईत सध्य सरासरी ७ लाख ८० हजार लिटर दूध विक्री होते. सोमवारी सकाळपासूनच धुवाधार पाऊस सुरू असल्याने यंत्रणा काहीसी ठप्प झाली आहे. सोमवारी सुमारे वीस हजार लिटरने दूध विक्री कमी झाल्याची माहिती ‘गोकुळ’च्या वतीने देण्यात आली.
अशी राहिली विक्री लिटरमध्ये -
वार मुंबईतील विक्री मुंबईसह इतर शहरातील विक्री
शुक्रवार ७.८२ लाख १२.८१ लाख
शनिवार ७.७० लाख १२.६३ लाख
रविवार ७.६० लाख १२.३८ लाख
सोमवार ७.४० लाख १२.५१ लाख