परमिट रूममधून मद्यविक्री शासन नियमानुसारच;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:45+5:302021-04-09T04:26:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वाईन शॉपमधील मद्यविक्री एमआरपी किमतीवर होते. याउलट परमिट रूममधून मद्यविक्रीवर शासनाला अतिरिक्त कर भरावा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वाईन शॉपमधील मद्यविक्री एमआरपी किमतीवर होते. याउलट परमिट रूममधून मद्यविक्रीवर शासनाला अतिरिक्त कर भरावा लागतो. त्यामुळे वाईन शॉपपेक्षा परमिट रूममधील मद्याचे दर जास्त आहेत. त्यात कोणताही काळाबाजार व ग्राहकांची लूट केली जात नसल्याचे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मद्य-खाद्य विक्रेता व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गद्रे, राजेंद्र जाधव यांनी केले आहे. ‘लोकमत’मध्ये गुरुवारच्या अंकात त्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाले होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फारशी वाईन शॉप नाहीत. चंदगड, शाहुवाडीसारख्या तालुक्यांत तर एकही वाईन शॉप नाही. त्यामुळे गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला. त्यामुळे शासनाने यावेळी मार्गदर्शक सूचना व नियम-अटी घालून परमिट रूममधून मद्य विक्रीस परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात सुमारे १२०० परमिट रूम आहेत. त्यामुळे मद्य खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाही. त्याशिवाय सहजरित्या मद्य उपलब्ध होत असल्याने काळ्याबाजारास आळा बसला आहे. वाईन शॉप व परमिट रूमच्या कर आकारणीत तफावत असल्याने दरातही तफावत आहे.