पिस्तुलासह पसार झालेला सलीम मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 09:39 AM2019-04-10T09:39:15+5:302019-04-10T09:48:25+5:30

यादवनगर येथील मटका अड्डयावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करून पिस्तूल घेऊन पसार झालेला मटका चालक सलीम यासिन मुल्लासह त्याच्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

Salim Mulla is in police custody in kolhapur | पिस्तुलासह पसार झालेला सलीम मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

पिस्तुलासह पसार झालेला सलीम मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या पथकावर हल्ला करून पिस्तूल घेऊन पसार झालेला मटका चालक सलीम यासिन मुल्लासह त्याच्या भावांना पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी सरकारी पिस्तूल ताब्यात घेतले आहे.

एकनाथ पाटील

कोल्हापूर - यादवनगर येथील मटका अड्डयावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करून पिस्तूल घेऊन पसार झालेला मटका चालक सलीम यासिन मुल्लासह त्याच्या भावांना पोलिसांनीअटक केली आहे. पोलिसांनी सरकारी पिस्तूल ताब्यात घेतले आहे. सलीम यासिन मुल्लासह त्याच्या भावांना बुधवारी (10 एप्रिल)  दूपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

अवैध व्यावसायिकाकडून पोलिसांना मारहाण करून त्यांचेच पिस्तूल काढून पसार झाल्याची कोल्हापूरमधील ही पहिलीच घटना आहे. नेहमी काही पोलिसांसोबत उठबस असणारा गुन्हेगार सलीम मुल्लाची मग्रुरी वाढली त्याला पोलीस कारणीभूत आहेत. काही महिन्यांनी पुन्हा कारागृहातून बाहेर आल्यानंतर हाच सलीम पोलिसांना हाताशी धरून पुन्हा मटका सुरू करणार असल्याचं परिसरातील नागरिक म्हणत  आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगाराला मोका लावा अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.

 

Web Title: Salim Mulla is in police custody in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.