जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण ६१ टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:36 AM2020-12-14T04:36:37+5:302020-12-14T04:36:37+5:30

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील जनावरांचे लाळखुरकत लसीकरण सुरू आहे. ...

Salivary vaccination is 61 percent complete in the district | जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण ६१ टक्के पूर्ण

जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण ६१ टक्के पूर्ण

Next

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील जनावरांचे लाळखुरकत लसीकरण सुरू आहे. लसीकरणाबरोबरच जनावरांचे टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी इनाफमध्ये केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पशुधन ८ लाख ७४ हजार ३३२ असून, त्यापैकी लसीकरणासाठी ७ लाख ८३ हजार ७२३ पशुधनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. करवीर तालुक्यात सर्वाधिक ७४ हजार लसीकरण झाले आहे

३१ डिसेंबरपर्यंत इनाफ टॅगिंग नोंदणी पूर्ण करावयाची आहे. कोरोना, अपुरी कर्मचारी संख्या, ऑनलाईन रेंजची अडचण वाढत आहेत. त्यामुळेच यासाठी मुदतवाढही मिळण्याची शक्यता आहे. अजूनही ग्रामीण भागात या लसीकरण व इनाफ टॅगिंग करण्याच्या मोहिमेबाबत फारसी जागरूकता निर्माण झालेली नाही.

* ९ डिसेंबरअखेर पूर्ण झालेले तालुकानिहाय लसीकरण...

तालुका झालेले लसीकरण

करवीर - ७४,०१६

हातकणंगले - ४२,२५७

चंदगड - ३६,३८१

आजरा - २७,५२७

गडहिंग्लज - ३८,३३९

शाहूवाडी - ५७,८२८

पन्हाळा - ५५,५९९

कागल - ४३,७६५

भुदरगड - २१,९२०

शिरोळ - ३५,५८६

राधानगरी - २६,४२१

गगनबावडा - ७,९६१

----------------------------------------

एकूण -- ४,६७,५००

प्रतिक्रिया

लसीकरण व इनाफ टॅगिंग ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. इनाफ बिल्ल्यामुळे जातिवंत जनावरांची वंशावळ व सर्व वैद्यकीय नोंदी ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांना जातिवंत जनावर निवडीसाठी मदत होणार आहे. भविष्यात इनाफ बिल्ल्याशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही.

डॉ. वाय. ए. पठाण, (जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त)

Web Title: Salivary vaccination is 61 percent complete in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.