शिवसेनेच्या यादीत साळोखे, टिपुगडेंची वर्णी

By admin | Published: October 4, 2015 12:35 AM2015-10-04T00:35:06+5:302015-10-04T00:35:06+5:30

महापालिका निवडणूक : ‘कैलासगडची स्वारी, व्हीनस कॉर्नर’ रेंगाळले

Salokhe, Tipu Gadnee Varni on Shivsena's list | शिवसेनेच्या यादीत साळोखे, टिपुगडेंची वर्णी

शिवसेनेच्या यादीत साळोखे, टिपुगडेंची वर्णी

Next

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने शनिवारी १७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजी महापौर उदय साळोखे आणि विद्यमान नगरसेविका अरुणा टिपुगडे यांचे पती, माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे यांचा समावेश केला आहे.
महापालिका निवडणूक १ नोव्हेंबरला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर व शहर प्रमुख संजय पवार यांनी शनिवारी सकाळी बैठक घेऊन सुमारे १७ उमेदवार निश्चित करून सायंकाळी जाहीर केले. यापूर्वी शिवसेनेकडून ४१ उमेदवारांची यादी निश्चित केली होती. यामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांना स्थान दिले होते. त्यामुळे एकूण ५८ उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत; पण दुसऱ्या जाहीर केलेल्या १७ उमेदवारांच्या नावावरून शिवसेनेत वादळ उठले आहे. काही प्रभागांतील शिवसैनिकांत नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांनी सायंकाळपर्यंत कसोशीने प्रयत्न केला. त्यामध्ये काही उमेदवारांची मनधरणी करण्यात आली, त्यात यशही आले. पण, तटाकडील प्रभाग आणि दुधाळी पॅव्हेलियन या प्रभागांतील नाराजी दूर करण्यात नेत्यांना अपयश आले आहे. त्यामुळे उर्वरित २३ उमेदवारांचीही यादी येत्या मंगळवारी (दि. ६) जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, कैलासगडची स्वारी, पांजरपोळ, व्हीनस कॉर्नर, सदर बझार, बाजार गेट, सिद्धाळा गार्डन हे बहुचर्चित प्रभागांकडे बहुतांश शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागांत उमेदवारी मिळविण्यासाठी एकापेक्षा अनेक इच्छुक असल्याने येथेही नाराजी टाळण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरूआहेत. त्यामुळे येथेही उमेदवारांची यादी जाहीर करताना नेत्यांचा कस लागणार आहे. त्यामुळे या प्रभागातील उमेदवार निश्चित होऊ शकले नाहीत. शिवसेनेतील नाराजांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेतील एक यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यांनी बंडखोरी टाळण्यासाठी हालचाली सुुरूकेल्या आहेत. शिवसेनेच्या यादीतील नाराज उमेदवारांवर इतर आघाड्यांच्याही नजरा लागून राहिल्या आहेत.
शिवसेना उमेदवारांची दुसरी यादी
प्रभाग क्र. प्रभागाचे नाव उमेदवार
१ शुगर मिल रमेश तुकाराम पोवार
५ लक्ष्मीविलास पॅलेस प्रकाश कोळी
७ सर्किट हाऊस संध्या सुशीलकुमार पागर
१३ रमणमळा चंद्रशेखर आप्पासो बेडगकर
१६ शिवाजी पार्क विश्वजित मोहिते
३७ राजारामपुरी-पाटणे हायस्कूल प्रतिज्ञा महेश उत्तुरे
४४ मंगेशकरनगर शिवाजी कोंडिबा गवळी
४८ तटाकडील तालीम उदय बळवंतराव साळोखे
५५ पद्माराजे उद्यान महेश शंकरराव चौगुले
५६ संभाजीनगर बसस्थानक दत्ताजी टिपुगडे
५९ नेहरूनगर सरोजनी राजू पोळ
६२ बुद्धगार्डन विद्या हेमंत निरंकारी
६६ स्वातंत्र्यसैनिक कॉेलनी कोमल महादेव बिरजे
६८ कळंबा फिल्टर हाऊस वैशाली सुरेश कांबळे
७० राजलक्ष्मीनगर आरती इंद्रजित साळोखे
७३ फुलेवाडी रिंग रोड सुनीता गजानन मोरे
७९ सुर्वेनगर उषा शामराव खतकर

Web Title: Salokhe, Tipu Gadnee Varni on Shivsena's list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.