समरजितसिंह घाटगे अखेर भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 01:45 AM2016-10-21T01:45:23+5:302016-10-21T01:48:19+5:30

चंद्रकांतदादांच्या प्रयत्नांना यश : शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश

Samarajejitsinh Ghatge finally in the BJP | समरजितसिंह घाटगे अखेर भाजपमध्ये

समरजितसिंह घाटगे अखेर भाजपमध्ये

Next

कोल्हापूर : छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमधील प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. उद्या, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सकाळी दहा वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्षपदही त्यांना देण्याचे निश्चित झाले असून, त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका वजनदार सहकार समूहाचे नेतृत्व पक्षात आणण्यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना यश आले आहे.
गेल्या महिन्यात गडहिंग्लज येथील भाजपच्या कार्यक्रमात जिल्ह्यात भूकंप करण्याची घोषणा चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. त्याची सुरुवात झाली असून अजूनही अनेक नेते रांगेत असल्याने एकामागोमाग अनेकांचे प्रवेश होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. सहकारातील आदर्श ज्यांनी निर्माण केला त्या विक्रमसिंह घाटगे यांचा वारसा चालविणाऱ्या समरजितसिंह यांना पक्षात घेण्यासाठी पाटील यांचे गेली काही महिने प्रयत्न सुरू होते. २६ जूनला देवेंद्र फडणवीस हे कागलला शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी शिरोली ते कागल या प्रवासादरम्यान समरजित यांना मुख्यमंत्र्यांच्या (पान ११ वर)


मी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी चंद्रकांतदादा पाटील यांची मनापासून इच्छा होती. गेल्या वर्षभरापासून त्यांनी मोठं योगदान दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागलला घेऊन येण्यापासून प्रत्येक टप्प्यावर त्यांनी यासाठी प्रयत्न केले. तसेच शेवटच्या टप्प्यात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही अगदी राजे असते तर जसे मार्गदर्शन केले असते त्या पद्धतीने मला दिशा दिली आणि माझा हा निर्णय झाला. विक्रमसिंह घाटगे गटाला शोभेल अशाच पद्धतीने आणि विश्वासाला पात्र राहून काम करीत राहणार आहे.
- समरजितसिंह घाटगे,
अध्यक्ष, शाहू साखर कारखाना

Web Title: Samarajejitsinh Ghatge finally in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.