पंतप्रधानांसोबतच्या ऊस परिषदेत कोल्हापुरातून समरजितराजे, शामराव देसार्इंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:18 AM2018-07-05T11:18:13+5:302018-07-05T11:21:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत २९ जून रोजी आयोजित केलेल्या ऊस परिषदेसाठी कोल्हापुरातून ‘म्हाडा’चे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई व सुजाता देसाई यांनी उपस्थिती लावली.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत २९ जून रोजी आयोजित केलेल्या ऊस परिषदेसाठी कोल्हापुरातून ‘म्हाडा’चे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई व सुजाता देसाई यांनी उपस्थिती लावली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण परिषद पंतप्रधान मोदी यांनी आयोजित केली होती; त्यासाठी देशातील १७५ ऊस उत्पादक शेतकरी व तज्ज्ञांना बोलावले होते. यामध्ये समरजितसिंह घाटगे, शामराव देसाई व त्यांच्या पत्नी सुजाता देसाई यांना निमंत्रित केले होते. उसाचा उत्पादन खर्च, एफआरपीबाबत चर्चा झाली.
यावेळी शामराव देसाई यांनी थेट उसापासून इथेनॉल निर्मितीबाबत म्हणणे सादर केले. साखर कारखाने डिस्टीलरीतून इथेनॉल निर्मिती करणार आहेत; पण त्यावर मर्यादा आहेत.
यासाठी अतिरिक्त उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करायचे झाल्यास नवीन कारखाने उभे करावे लागतील. याबाबत केंद्राने निर्णय घेण्याची मागणी देसाई यांनी केली. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.
यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह, खासदार प्रितम मुंडे, आदी उपस्थित होते.