समरजित अपक्ष म्हणून शड्डू ठोकणार; : युतीमधील पहिली बंडखोरी कागलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 08:37 PM2019-09-30T20:37:31+5:302019-09-30T20:39:03+5:30
गेली दोन-अडीच वर्षे घाटगे यांच्या उमेदवारीस भाजपकडून बळ देण्यात आले होते. त्यामुळे काही झाले तरी कागलमधून समरजित घाटगे हेच युतीचे मग त्यात भाजप किंवा शिवसेना कोणत्याही पक्षाचे उमेदवार असतील असे चित्र होते; परंतु युतीचे अधिकृत जागावाटप जाहीर
कोल्हापूर : शाहू समूहाचे अध्यक्ष व पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीमधील पहिली बंडखोरी कागलमध्येच होत आहे. समरजित यांनी आज, मंगळवारी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा बोलाविला आहे. त्यामध्ये ते रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत.
हा मेळावा कागल-मुरगूड रस्त्यावरील डीकेएम भवनमध्ये होईल. त्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास घाटगे हे पत्रकार परिषदेत आपल्या पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत. या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन घाटगे गटातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे एक तरी माघार घेऊन गप्प बसणे किंवा लढणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत म्हणून ‘ठरवायचं नाही...लढायचंच’ अशी भूमिका घेऊन आता राजेगट त्वेषाने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
म्हाडा अध्यक्षपदाचा राजीनामा..
भाजपमध्ये आल्यानंतर राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्षपद समरजित घाटगे यांना देण्यात आले होते; परंतु अपक्ष म्हणून लढायचे पक्के झाल्यामुळे त्यांनी या पदाचाही राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देऊ केला आहे.