कोलेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी भांबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 07:43 PM2021-04-06T19:43:30+5:302021-04-06T19:45:09+5:30
College EducationSector Kolhapur- नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संभाजी बाबूराव भांबर यांची निवड झाली.
गडहिंग्लज :नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संभाजी बाबूराव भांबर यांची निवड झाली.
प्राचार्य डॉ. के. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्तीमुळे प्राचार्यपद रिक्त झाले होते. संस्थाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अॅड. हेमंत कोलेकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.त्यानंतर मावळते प्राचार्य डॉ.पाटील व स्टाफ सेक्रेटरी डॉ. मनोहर कोळसेकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला.
डॉ. भांबर हे महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून गेली २३ वर्ष कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठ इंग्रजी अभ्यास मंडळावर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष व विद्यापरिषद सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.आज अखेर त्यांचे ६७ शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थ्यांनी पीएचडी संपादीत केली आहे.
यावेळी क्रिडा विभाग प्रमुख डॉ. कंचन बेल्लद, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी डॉ. संजय कांबळे, ग्रंथपाल शशिकांत देसाई, प्रा. एम. के. चव्हाण, प्रा. एस. बी. चौगुले, मोहन शिंदे, रविंद्र हिडदुगी, शशिकांत सलामवाडे, दिनकर पाटील, विठ्ठल आजगेकर उपस्थित होते.