कोल्हापूर जिल्ह्यात संभाजी महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:56 AM2018-05-15T00:56:37+5:302018-05-15T00:56:37+5:30

Sambhaji Maharaj Jayanti excited in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात संभाजी महाराज जयंती उत्साहात

कोल्हापूर जिल्ह्यात संभाजी महाराज जयंती उत्साहात

googlenewsNext


कागल : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती कागल शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काही काळ एकत्रित ही पालखी वाहिली. या जयंती सोहळ्यात शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
येथील खर्डेकर चौकात ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पोटे यांच्या हस्ते सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर चौकात उभारण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, भय्या माने, नितीन दिंडे, राजेंद्र जाधव, विशाल पाटील-मळगेकर, दीपक मगर, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राहुल घोरपडे, किरण मुळीक, एस. डी. पाटील, शंतनू शिंदे, आशाकाकी जगदाळे, रेवती बरकाळे, आदींसह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
सायंकाळी बसस्थानक चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत लेझीम पथक, वारकरी पथक, आदींचा सहभाग होता. शहराच्या मुख्य मार्गावरून ही मिरवणूक नेण्यात आली.
अर्जुनवाडमध्ये पुतळा पूजन
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुनील चौगुले, नंदकुमार पाटील, संदेश महाडिक, मारुती ढवळे, अनुप पाटील, संतोष ठाकूर, संभाजी कळंत्रे, विलास पाटील, उदय मेडसिंगे, प्रदीप चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हलकर्णीत जयंती उत्साहात
हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले सामानगडावरून आणलेल्या ज्योतीचे पूजन सामाजिक कार्यकर्ते गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवाजी लोखंडे, रामचंद्र हसबे, बाळू गोकावी, श्रीकांत कागीनकर, सुनील भोसले, आप्पासाहेब पोवार, आनंदा राऊत, श्रीकांत सावंत यांच्यासह शिवशंभू प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोतोलीत विविध कार्यक्रम
कोतोली : कोतोली परिसरात छत्रपती संभाजी राजे जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी संयुक्त कोतोली यांच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधन रॅली काढण्यात आली. यावेळी उपसरपंच राजेंद्र लव्हटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तरुण मंडळांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, कृषी अधिकारी भाऊसो तुरंबेकर, बाजीराव लव्हटे, अशोक लव्हटे, राज गंधवाले, सागर वरपे, आदींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
हातकणंगलेत विविध उपक्रम
हातकणंगले : हातकणंगले येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच रोहणी खोत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, संजय चौगुले, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, उपसरपंच चंद्रकांत जाधव, माजी सरपंच नूरमहंमद मुजावर, संदीप कांबळे, मिथुन जाधव, सूरज सूर्यवंशी, अजित मोरे, मयूर चौगुले, मिलिंद चौगुले, सुरेश जाधव, सागर शिंदे, रतन धनगर, सचिन जाधव, यांच्यासह अन्य मान्यवर उपास्थित होते.
म्हाकवेत जयंती उत्साहात
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथे स्वराज्यवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुण मंडळांच्यावतीने पन्हाळा गडावरून आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले. तसेच ज्योतीची व संभाजी महाराजांच्या प्रतिमेची गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संभाजी महाराजांच्या जन्म पाळणा गायनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
धर्मवीर संभाजी महाराजांच्या
प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात
आली.

Web Title: Sambhaji Maharaj Jayanti excited in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.