संभाजी माने ‘प्रधानमंत्री सडक’चे राज्याचे प्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:50+5:302021-09-04T04:27:50+5:30
कोल्हापूर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांची प्रधानमंत्री सडक योजनेचे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्य अभियंता ...
कोल्हापूर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांची प्रधानमंत्री सडक योजनेचे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्य अभियंता या पदावर पुणे येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. राज्यभरातील प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सडक योजनेचे कामकाज त्यांच्या अधिपत्याखाली राहणार आहे. त्यांच्या जागी अजूनही कोणी हजर झालेले नाहीत.
येथील दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांची रत्नागिरी येथे रस्ते मार्ग प्रकल्प विभागाकडे कार्यकारी अभियंता म्हणून बदली झाली आहे. तेथील नव्या रस्त्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. त्यांच्या ठिकाणी प्रवीण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव हे २०१७ ते २०२० या कालावधीत कोल्हापूर येथेच विशेष प्रकल्प शाखेकडे कार्यरत होते. मूळचे कऱ्हाड येथील असलेले जाधव कोल्हापूर महापालिकेकडेही होते.
उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांची सातारा उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी संजय पाटील यांनी कार्यभार स्वीकारला आहे. हातकणंगले तालुक्यातील साजणीचे असलेले पाटील यांनी याआधी सातारा जिल्हा परिषद, पुणे प्रधानमंत्री सडक योजना विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले आहे.
०३०९२०२१ कोल संभाजी माने