Maratha Reservation : सध्या कायदेशीर लढाई, दखल न घेतल्यास वेगळा विचार: संभाजीराजेंचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 02:56 PM2021-05-24T14:56:07+5:302021-05-24T15:01:04+5:30
Maratha Reservation Kolhapur : मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार एकमेकाकडे बोटे दाखवून चेष्टा करत आहे. आरक्षणाविना समाज अस्वस्थ असताना मी आक्रमक व्हायचे नाही का? असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी केला. सध्या तरी संयमाने कायदेशीर मार्गाने लढा सुरु करायचा आहे, वेळ प्रसंगी दखल घेतली नाहीतर वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार एकमेकाकडे बोटे दाखवून चेष्टा करत आहे. आरक्षणाविना समाज अस्वस्थ असताना मी आक्रमक व्हायचे नाही का? असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी केला. सध्या तरी संयमाने कायदेशीर मार्गाने लढा सुरु करायचा आहे, वेळ प्रसंगी दखल घेतली नाहीतर वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदीर येथे कोल्हापूर शहरातील तालीम संस्थांचे प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
कोल्हापूरातील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक, आरक्षणाचे अभ्यासक, इतिहास संशोधक, विविध क्षेत्रातील विचारवंत तसेच इतर समाजातील प्रमुख व्यक्तींबरोबर संवाद साधला.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 24, 2021
मराठा आरक्षणाविषयी सर्वांची मते जाणून घेतली.
सर्वच स्तरातून मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा मिळत आहे.#मराठा_आरक्षणpic.twitter.com/4MftxUpy1Y
यावेळी विविध संघटना, मंडळांनी संभाजीराजेंना पाठींब्याची पत्रे दिली. फत्तेसिंह सावंत, निवास साळोखे, दिलीप देसाई, महेश जाधव, प्रमोद पाटील, अजित राउत, बाबा पार्टे, सुजीत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम जरग, सुरेश जरग, अजित खराडे, इंद्रजीत बोंद्रे, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.