संभाजीनगर मंडळ करणार अवयवदान जागृती

By admin | Published: August 31, 2016 12:30 AM2016-08-31T00:30:14+5:302016-08-31T00:37:35+5:30

ध्वनी प्रदूषणास विरोध : उत्सव काळातील जमा निधीतून अनेक सामाजिक उपक्रम

Sambhajinagar Mandal Organizes Organizational Organizations Organize Organisation | संभाजीनगर मंडळ करणार अवयवदान जागृती

संभाजीनगर मंडळ करणार अवयवदान जागृती

Next

कोल्हापूर : विधायक गणेशोत्सवाची परंपरा राखणाऱ्या संभाजी नगर तरुण मंडळाने उत्सवनिधीतून सामाजिक कार्याची परंपरा कायम राखली आहे. ‘नो मोअर डॉल्बी’चा संदेश दिलेल्या या मंडळाने यंदाच्या उत्सवात
अवयवदान जागृतीची मोहीम हाती घेतली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी गतवर्षीपासून मंडळाने गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजीनगर तरुण मंडळातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचे यंदाचे ७० वे वर्ष आहे. मंडळातर्फे दरवर्षी एका सामाजिक विषयाला अनुसरून कार्य केले जाते. या मंडळाची साडेसात फूट उंचीची गणेशमूर्ती शाडूपासून बनविली जाते. हा गणपती शहरातील प्रमुख गणपतींपैकी एक असून तो ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून प्रसिद्ध आहे. उत्सवकाळात मंडळाकडे जवळपास दोन ट्रक नारळ जमा होतात. रेसकोर्सपासून पुढे आपण यायला निघालो की, रस्त्याच्या दुभाजकांमध्ये सुंदर फुलांच्या लहान-लहान झाडींनी रस्त्याचे रूपच पालटून गेले आहे. ही किमया केली आहे संभाजीनगर तरुण मंडळाने.
उत्सवातून जमा होणाऱ्या निधीतून व आयडियल स्पोर्टस् क्लबच्या विद्यमाने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बालकल्याण संकुल, चेतना विकास मंदिर या संस्थांसह विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांचा शालेय खर्च मंडळ उचलते.
मंडळातर्फे यावर्षी उत्सवकाळात अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात म्हणून मंडळाचे कार्यकर्ते अवयव दानचे अर्ज भरणार आहेत. याशिवाय स्क्रीनवरून अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)


मंडळाची विधायक कामे
उत्सव काळात २१०० रोपांचे वाटप
बेटी बचाओ अभियान
‘नो मोर डॉल्बी’ अभियान
खड्ड्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधले
उत्सवातून सीमा लढ्याला पाठबळ
पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात औषध फवारणी
शस्त्र प्रदर्शन
महादेव मंदिराची उभारणी

होय, आम्ही डॉल्बी लावत नाही

Web Title: Sambhajinagar Mandal Organizes Organizational Organizations Organize Organisation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.