समीर गायकवाड आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात

By admin | Published: February 23, 2016 01:09 AM2016-02-23T01:09:41+5:302016-02-23T01:12:55+5:30

पानसरे हत्या प्रकरण : खटल्याची सुनावणी कोल्हापुरातच होणार

Sameer Gaikwad today in the court of video conferencing | समीर गायकवाड आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात

समीर गायकवाड आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या दालनात होत आहे. या सुनावणीसाठी आरोपी समीर याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका संशयित आरोपी समीर गायकवाड याचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मागे घेतल्याने या खटल्याची सुनावणी आता कोल्हापुरात होणार हे स्पष्ट झाले आहे.
पानसरे यांच्या खटल्याची सुनावणी नि:ष्पक्षपातीपणे व्हावी, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशी याचिका संशयित आरोपी समीर गायकवाड याने गतवर्षी दि. १८ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्याची सुनावणी दि. १४ जानेवारी व दि. २ फेब्रुवारीस झाली. दि. २ फेब्रुवारीस झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश साधना जाधव यांनी सरकारी वकिलांच्या तपासातील दिरंगाईवर ताशेरे ओढले होते. पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने या खटल्यात बाजू मांडण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांचीही नियुक्ती केली होती. ही सुनावणी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्'ांत कुठेतरी व्हावी, अशी गायकवाड याची मागणी होती; परंतु त्याचे वकील पुनाळेकर यांनी ही याचिका मागे घेतल्याने सुनावणी कोल्हापुरातच होणार हे स्पष्ट झाले. उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास एसआयटी, सीबीआय व कर्नाटक सीआयडी या तिन्ही यंत्रणा समन्वयाने करत आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या गोळ््यांच्या पाच पुंगळ््या व पानसरे यांच्या शरीरात मिळाळेली एक गोळी ताब्यात घेतली आहे. यापूर्वी पोलिसांनी ३९२ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. तपासाचा पुरवणी अहवाल अद्याप सादर केलेला नाही. आज, मंगळवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश बिले व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समीरशी संवाद साधणार आहेत.
यावेळी ते त्याला गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा करतील. त्यानंतर त्याच्या विरोधातील चौकशी पुरवणी अहवाल पोलिसांनी सादर केल्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होईल, अशी माहिती न्यायालयीन सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुरवणी अहवालावर खटल्याचा प्रारंभ
पानसरे हत्येचा तपास अद्याप अर्धवट आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट तसेच साक्षीदारांचे जबाब व गोपनिय तपासाचा पुरवणी अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर समीरवर क्रिमीनल अ‍ॅक्ट १७३/८ प्रमाणे आरोपपत्र ठेवून या खटल्याच्या सुनावणीस सुरुवात होईल. त्यामुळे हा खटला लवकर सुरू होण्यासाठी पोलिसांनी पुरवणी अहवाल लवकर सादर करणे आवश्यक असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले.
हर्षद निंबाळकर पुढच्या सुनावणीला येणार
पानसरे हत्या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने वरिष्ठ वकिलांनी बाजू मांडावी; अशी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार पुण्याचे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी समीरला जामीन मिळू नये, यासाठी अ‍ॅड. निंबाळकर यांनी युक्तिवाद मांडला होता. आजच्या सुनावणीला ते हजर राहणार नाहीत; परंतु त्या पुढच्या सुनावणीला ते हजर राहून युक्तिवाद मांडणार आहेत.

Web Title: Sameer Gaikwad today in the court of video conferencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.